महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ठाणे जिल्ह्यातून तिघांना अटक केली आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी संबंधित व्यक्तीला भारतातील प्रतिबंधित आणि संवेदनशील भागांची माहिती दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पथकाचा पुढील तपास सुरु आहे.
या व्यक्तींच्या कारवायांबद्दल एटीएसला गुप्त माहिती मिळाली होती. तपासात असे दिसून आले की आरोपीने नोव्हेंबर २०२४ मध्ये फेसबुकद्वारे एका पाकिस्तानी गुप्तचर एजंटशी (पीआयओ) संपर्क साधला होता. त्यानंतर त्याने व्हॉट्सॲपद्वारे भारतातील प्रतिबंधित क्षेत्रांबद्दल अनेक वेळा गोपनीय माहिती पाठवली. या प्रकरणात, संशयित आरोपी आणि त्याच्या संपर्कात असलेल्या इतर दोन अशी एकूण तिघांना अटक झाली.
चौकशीदरम्यान, आरोपीने कबूल केले की तो एका पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात होता. त्याने २०२४ ते २०२५ पर्यंत भारताने प्रतिबंधक केलेल्या क्षेत्राची गोपनीय माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून पाकिस्तानला पुरविली. या प्रकरणी आरोपींवर १९२३ च्या अधिकृत गुपिते कायदाच्या कलम ३(१)(ब), ५(अ) आणि भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलम ६१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा :
सनातन धर्मात महिलांना आदर मिळतो, म्हणून निदा खानने सोडला इस्लाम!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पाटणा विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन
अमेरिकेतील ‘सांबा’ शिळेवरून उतरला..
एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह म्हणाले, एकदा मी ठरवलं तर मी स्वतःचंही ऐकत नाही!
दरम्यान, देशाच्या अनेक भागांमधून संशयित हेरांना अटक करण्यात आली आहे, येत आहे. राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील सकूर खानला कालच अटक करण्यात आली. पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंससाठी (ISI) हेरगिरी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. शकूर खान जिल्हा रोजगार कार्यालयात लिपिक म्हणून काम करतो. त्याने यापूर्वी काँग्रेस सरकारमधील माजी मंत्री शाले मोहम्मद यांचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम केले आहे. तसेच तपासात त्याने पाकिस्तानला ६-७ वेळा भेट दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी त्याची कसून चौकशी केली जात आहे.







