मुंबईतून अख्तर हुसैनी या ६० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली होती. भाभा अणु संशोधन केंद्रात (BARC) शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करत संवेदनशील अणु डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी त्याला कोट्यवधी रुपयांचा परदेशी निधी मिळाला होता, अशी माहिती समोर आली होती. या प्रकरणात आता आणखी तपशील समोर आले आहेत.
“वैज्ञानिक सहकार्य” आणि “संशोधन भागीदारी”च्या बहाण्याने इराणमधील कंपन्यांना अणुऊर्जेशी संबंधित डिझाइन विकण्याचा प्रयत्न अख्तर याने केला होता. या प्रकरणात अख्तर हुसैनीचा भाऊ आदिल यालाही अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार, मार्च आणि एप्रिलच्या सुमारास या दोघांनी तेहरानला भेट दिली. तसेच भारत आणि दुबईमधील इराणी दूतावासांनाही अनेक वेळा भेट दिली. त्यांनी मुंबईस्थित एका इराणी राजदूताचीही बीएआरसीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ असल्याचे भासवून फसवणूक केली. बनावट तपशील आणि रिअॅक्टर ब्लूप्रिंटद्वारे राजदूताची फसवणूक करण्यात आली, अशी माहिती समोर आली आहे.
गेल्या माहिन्यात मुंबई पोलिसांनी अख्तर हुसैनी याला बीएआरसी शास्त्रज्ञ असल्याची खोटी ओळख दाखवून देशभर प्रवास केल्याबद्दल अटक केली होती. यानंतर झारखंडच्या जमशेदपूर येथील रहिवासी असलेल्या हुसैनीकडून अण्वस्त्रांशी संबंधित १० हून अधिक नकाशे आणि डेटा देखील जप्त करण्यात आला आहे. यासोबतच त्याच्याकडून अनेक बनावट पासपोर्ट, आधार आणि पॅन कार्ड, बनावट बीएआरसी आयडी देखील जप्त करण्यात आली आहे. एका आयडीवर त्याचे नाव अली रझा हुसेन होते, तर दुसऱ्या आयडीवर त्याचे नाव अलेक्झांडर पामर असे असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, अख्तर हुसैनीचा भाऊ आदिल यालाही दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा..
“राहुल गांधींचा बॉम्ब फुटतचं नाहीये!” काय म्हणाले केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू?
पराभवाच्या भीतीने राहुल गांधींकडून वातावरण तयार करण्याचा प्रकार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘वंदे मातरम’चं महत्त्व का विषद केलं?
हरियाणात २५ लाख मते चोरीला गेल्याचा राहुल गांधींचा दावा
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, हुसैनी बंधूंना १९९५ पासून परकीय निधी मिळू लागला. सुरुवातीला त्यांना लाखो रुपये देण्यात आले, पण साल २००० नंतर त्यांना कोटी रुपये देण्यात आले.







