लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हरियाणातील विधानसभा निवडणुकीवरून भाजपा आणि निवडणूक आयोगावर टीका केली. पत्रकार परिषदेत त्यांनी काही पुरावे दाखवून ब्राझीलमधल्या मॉडेलने हरियाणात १० वेळा मतदान केल्याचे सांगितले. राहुल गांधी म्हणाले की, हरियाणा विधानसभा निवडणुकीत आमच्या उमेदवाराने काहीतरी चुकीचे असल्याचे सांगितले होते. एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचे दाखवले होते. सर्व पोल हे भाकीत करत होते, पण असे काय झाले की हरियाणामध्ये पहिल्यांदाच पोस्टल मत आणि प्रत्यक्ष मतांमध्ये तफावत दिसून आली? तपशीलवार शोध घेतला आणि ब्राझीलच्या मॉडेलचं नाव दिसलं, असे ते म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, हरियाणाच्या प्रत्यक्ष मतदान यादीत, एकाच महिलेचा फोटो अनेक ठिकाणी दिसतो. काही लोकांचे वय त्यांच्या फोटोंपेक्षा वेगळे आहे. निवडणूक आयोगाने हे स्पष्ट करावे की ही महिला इतक्या वेळा का दिसली. म्हणूनच निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज काढून टाकतो. हरियाणात अशी हजारो उदाहरणे आहेत. जर सीसीटीव्ही फुटेज नसेल तर कोणालाही कळणार नाही. मला हरियाणाच्या जनतेला हा प्रश्न विचारायचा आहे की ही कोण आहे? पुढे राहुल गांधी यांनी एका ब्राझिलियन मुलीचा फोटो दाखवला आणि विचारले, निवडणुकीत तिची भूमिका काय आहे? हरियाणातील पाच श्रेणींमध्ये २५ लाख मते चोरीला गेली. एका विधानसभा मतदारसंघात एका महिलेने २२ वेळा मतदान केले. या महिलेने सरस्वती, स्विटी, संगिता अशा विविध नावांनी मतदान केलं आहे. ही मॉडेल ब्राझीलची आहे. ती हरियाणाच्या मतदार यादीत आहे. केंद्राकडून हे नाव टाकण्यात आलं आहे. ब्राझीलच्या महिलेने १० बूथवर २२ वेळा मतदान केलं आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
हे ही वाचा:
मैदानात वादग्रस्त हावभाव करणाऱ्या हारिस रौफवर दोन सामन्यांची बंदी
चाचणी दरम्यान मोनोरेलचा अपघात; डबा रूळावरून घसरला
बिहारमध्ये एनडीए पुन्हा दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करेल
“मदरसा शब्दावर आक्षेप नाही!” उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी असे का म्हणाले?
अस्पष्ट फोटो वापरून मते चोरीला गेली; त्या व्यक्ती कोण आहे हे कोणालाही कळू शकत नाही. निवडणूक आयोगाकडे डुप्लिकेट मतदार काढून टाकण्यासाठी सॉफ्टवेअर आहे, पण ते ते का वापरत नाहीत? यासाठी एआयचीही आवश्यकता नाही; ते काही सेकंदात ते काढून टाकू शकतात, पण ते असे करत नाहीत कारण त्यांना भाजपला मदत करायची आहे. निवडणूक आयोगाला स्वच्छ निवडणूक नको आहे. हा ठोस पुरावा आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी टीका केली.







