२६ ऑक्टोबर २०२५ च्या “मन की बात” मधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक फार महत्त्वपूर्ण मुद्दा मांडलेला आहे, आणि त्यासंबंधी सूचनाही मागवल्या आहेत. विषयाला हात घालण्यापूर्वी प्रथम त्यांच्या भाषणातील संबंधित भाग उद्घृत करणे योग्य होईल. तो भाग असा :
अब ‘मन की बात’ में एक ऐसे विषय की बात, जो हम सबके दिलों के बेहद करीब है। ये विषय है हमारे राष्ट्र गीत का – भारत का राष्ट्र गीत यानी ‘वन्देमातरम्’। एक ऐसा गीत, जिसका पहला शब्द ही हमारे हृदय में भावनाओं का उफान ला देता है। ‘वन्देमातरम्’ इस एक शब्द में कितने ही भाव हैं, कितनी ऊर्जाएं हैं। सहज भाव में ये हमें माँ-भारती के वात्सल्य का अनुभव कराता है। यही हमें माँ-भारती की संतानों के रूप में अपने दायित्वों का बोध कराता है। अगर कठिनाई का समय होता है तो ‘वन्देमातरम्’ का उद्घोष १४० करोड़ भारतीयों को एकता की ऊर्जा से भर देता है।
साथियों,
राष्ट्रभक्ति, माँ-भारती से प्रेम, यह अगर शब्दों से परे की भावना है तो ‘वन्देमातरम्’ उस अमूर्त भावना को साकार स्वर देने वाला गीत है। इसकी रचना बंकिमचंद्र चट्टोपाध्याय जी ने सदियों की गुलामी से शिथिल हो चुके भारत में नए प्राण फूंकने के लिए की थी। ‘वन्देमातरम्’ भले ही 19वीं शताब्दी में लिखा गया था लेकिन इसकी भावना भारत की हजारों वर्ष पुरानी अमर चेतना से जुड़ी थी। वेदों ने जिस भाव को “माता भूमि: पुत्रो अहं पृथिव्या:”( Earth is the mother and I am her child) कहकर भारतीय सभ्यता की नींव रखी थी। बंकिमचंद्र जी ने ‘वन्देमातरम्’ लिखकर मातृभूमि और उसकी संतानों के उसी रिश्ते को भाव विश्व में एक मंत्र के रूप में बांध दिया था।
साथियों,
आप सोच रहे होंगे कि मैं अचानक से वन्देमातरम् की इतनी बातें क्यों कर रहा हूं। दरअसल कुछ ही दिनों बाद, 7 नवंबर को हम ‘वन्देमातरम्’ के 150वें वर्ष के उत्सव में प्रवेश करने वाले हैं। 150 वर्ष पूर्व ‘वन्देमातरम्’ की रचना हुई थी और 1896 (अट्ठारह सौ छियानवे) में गुरुदेव रवीन्द्रनाथ टैगोर ने पहली बार इसे गाया था।
साथियों,
‘वन्देमातरम्’ के गान में करोड़ों देशवासियों ने हमेशा राष्ट्र प्रेम के अपार उफान को महसूस किया है। हमारी पीढ़ियों ने ‘वन्देमातरम्’ के शब्दों में भारत के एक जीवंत और भव्य स्वरूप के दर्शन किए हैं।
सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्,
शस्यश्यामलाम्, मातरम्!
वंदे मातरम्!
हमें ऐसा ही भारत बनाना है। ‘वन्देमातरम्’ हमारे इन प्रयासों में हमेशा हमारी प्रेरणा बनेगा। इसलिए, हमें ‘वन्देमातरम्’ के 150वें वर्ष को भी यादगार बनाना है। आने वाली पीढ़ी के लिए ये संस्कार सरिता को हमें आगे बढ़ाना है। आने वाले समय में ‘वन्देमातरम्’ से जुड़े कई कार्यक्रम होंगे, देश में कई आयोजन होंगे। मैं चाहूँगा, हम सब देशवासी ‘वन्देमातरम्’ के गौरवगान के लिए स्वत: स्फूर्त भावना से भी प्रयास करें| आप मुझे अपने सुझाव #VandeMatram150 के साथ जरूर भेजिए। #VandeMatram150। मुझे आपके सुझावों का इंतजार रहेगा और हम सब इस अवसर को ऐतिहासिक बनाने के लिए काम करेंगे।
पंतप्रधानांच्या आवाहनाचा विचार करण्यापूर्वी, या गीताची थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी बघणे गरजेचे आहे. ती अशी – भारतीय स्वातंत्र्य लढ्यात या गीताने फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इ.स. १८९६ मध्ये जेव्हा कॉंग्रेसच्या अधिवेशनात गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत प्रथम गायले, तेव्हापासूनच या गीताला राजकीय महत्त्व प्राप्त झाले. १९०५ पासून स्वातंत्र्य लढ्यातील सैनिक आणि क्रांतिकारकांचे ते स्फूर्तीगीत बनले. या गीताच्या पहिल्या दोन कडव्यांना ऑक्टोबर १९३७ मध्ये राष्ट्रीय कॉंग्रेसने राष्ट्रगीताचा दर्जा दिला. हे गीत, आणि बंकिमचंद्र यांच्या ज्या कादंबरीत ते येते, ती आनंदमठ कादंबरी – या दोन्हींवर ब्रिटीश सरकारने बंदी घातली. ही बंदी पुढे १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वतंत्र भारताच्या सरकारकडून उठवली गेली.
२४ जानेवारी १९५० रोजी, भारतीय घटना समिती (Constituent Assembly of India) ने वंदे मातरम गीताला भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिली. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी असे स्पष्टपणे नमूद केले, की या गीताला “जन गण मन …..” या राष्ट्रगीता इतकाच सन्मान दिला जावा. (दि. २६ ऑक्टोबरच्या “मन की बात” मधील भाषणात पंतप्रधान राष्ट्रगीत म्हणून या गीताचा उल्लेख करतात, त्याचे कारण हेच आहे.)
जरी भारतीय राज्यघटनेत राष्ट्रगीताचा उल्लेख नसला, तरी, भारत सरकारने नोव्हेम्वर २०२२ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर करून असे स्पष्ट केले आहे, की “जन गण मन …..” आणि “वंदेमातरम्” एकाच पातळीवर असून, भारतीय नागरिकांनी दोन्हींना सारखाच सन्मान देणे आवश्यक आहे.
हे असे सगळे असूनही, काही विशिष्ट वर्गांचा या गीताला कायम विरोधच राहिला आहे. जेव्हा कॉंग्रेसने १९३७ मध्ये या गीताच्या केवळ पहिल्या दोन कडव्यांनाच राष्ट्रगीताचा दर्जा दिला, तेव्हाच या दोन कडव्यांना सुद्धा भविष्यात मुस्लीम विरोधच करतील. असे अत्यंत दूरदर्शीपणाचे विधान स्वा. सावरकर यांनी केले होते. अगदी अलीकडे महाराष्ट्र विधानसभेत अबू आझमी यांनी वंदेमातरम म्हणण्यास स्पष्ट नकार देऊन स्व. सावरकरांचे उद्गार तंतोतंत खरे ठरवले. असो.
आता आपण या बाबतीत आपल्याला नेमके काय करता येईल, या कडे वळू.
हे ही वाचा:
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधानंतरही जोहरान ममदानी विजयी
फिटनेसप्रेमी मिलिंद सोमणचा हेल्थ मंत्र काय ?
सर्वधर्मसमभाव, किंवा अल्पसंख्यांक तुष्टीकरणाच्या हेतूने या गीताला जो विरोध होऊ शकतो, त्याच्या भक्कम प्रतिवादासाठी आपल्याला भारतीय राज्यघटनेचा आधार उपलब्ध आहे. भारतीय राज्यघटना भाग 4 –(क) मध्ये नागरिकांची मुलभूत कर्तव्ये दिलेली आहेत. (ही अर्थातच सर्व नागरिकांसाठी आहेत, केवळ हिंदूंसाठी नव्हेत.) त्यामधील अनुच्छेद 51(क) व (ख) असे आहेत :
“संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.”
ज्यांमुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली, त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे.”
याचा अर्थ अगदी स्पष्ट आह्रे, तो म्हणजे राष्ट्रगीताच्या समान दर्जा असलेल्या “वंदेमातरम” चा आदर करणे, प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. राज्यघटने चा इतका भक्कम आधार असल्याने, वंदेमातरम गीताच्या सन्मानासाठी आपण बरेच काही करू शकतो. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार काही सूचना अशा :
आधार कार्ड, PAN कार्ड, ड्रायव्हिंग इत्यादी महत्त्वाची लायसेन्स, ….इत्यादींसाठी करावयाच्या अर्जांमध्ये अर्ज कर्त्याच्या नाव व सहीसाठी असलेल्या जागेच्या खाली “वंदेमातरम” स्पष्टपणे छापलेले असावे. त्यात कुठलीही खाडाखोड आढळल्यास अर्ज रद्द समजावा. शिवाय या सर्व कागदपत्रांमध्ये, ती छापताना त्यावर “वंदेमातरम” हे पार्श्वभूमीवर Inscripted असावे. ज्यांचा कुठल्याही कारणाने, “वंदेमातरम” ला विरोध असेल, त्यांनी अर्थातच ही कागदपत्रे घेऊ नयेत. त्यांच्यावर कोणतीही सक्ती नाही.
सरकारी नोकरीसाठी अर्ज, लोकप्रतिनिधित्व कायद्याखाली कोणत्याही निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज, …वगैरे भरतानाही अगदी याच तऱ्हेने, अर्ज कर्त्याला त्याचे नाव व सही, करण्याच्या जागेखाली “वंदेमातरम” छापलेले असेल, त्यावरच सही करावी लागेल. त्यात कुठलीही खाडाखोड आढळल्यास अर्ज रद्द समजला जाईल.
कोणत्याही कल्याणकारी सरकारी योजनांचे लाभ मिळवण्यासाठी अर्ज करतानाही अगदी अशीच तरतूद करावी. जर अर्ज कर्ता, “वंदेमातरम” ला कोणत्याही कारणाने विरोध करत असेल, तर तो “वंदेमातरम” या (योग्य जागी छापलेल्या) छापील शब्दांवर सही करणार नाही, त्यात खाडाखोड करेल, तर तो अर्ज आपोआप रद्द ठरेल.
भारतीय राज्यघटनेचा वर उल्लेखित आधार असल्याने, या उपायांच्या विरोधात कोणी न्यायालयात गेलाच, तर याचे भक्कम समर्थन घटनेच्या आधारे करता येईल. धर्मस्वातंत्र्याच्या, तथाकथित निधर्मितेच्या नावाखाली राष्ट्रगीताचा अवमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेता कामा नये.
वंदेमातरम गीताला १५० वर्षे होत आहेत, त्यानिमित्ताने या गीताच्या सन्मानासाठी काय करता येईल, या पंतप्रधानांच्या आवाहनाला हा विनम्र प्रतिसाद. या दिशेने काही प्रयत्न झाल्यास , तथाकथित निधर्मिता / धर्मस्वातंत्र्य आणि आपला राष्ट्रीय वारसा / राष्ट्रीयतेचा सन्मान यांमधील तिढा कायमचा सुटायला मदत होईल. वर उल्लेखित अधिकृत कागदपत्रांवर वंदेमातरम छापण्यास विरोध झाल्यास तो कणखरपणे मोडून काढावा लागेल.







