बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी “हायड्रोजन बॉम्ब” स्फोट केल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणामध्ये मत चोरी आणि हेराफेरीचे आरोप केले. त्यांनी आरोप केला की हरियाणामध्ये २५ लाख मते चोरीला गेली. यावर आता भाजपाकडून राहुल गांधी आणि कॉंग्रेसवर निशाणा साधला जात आहे.
राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, भाजपाचे नेते किरण रिजिजू यांनी आज पत्रकार परिषद घेत राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिलं. ते म्हणाले, “राहुल गांधींचा एटोम बॉम्ब काही फुटत नाही. राहुल गांधी कोणतीही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. आज त्यांनी जो विषय मांडला तो पूर्णपणे खोटा आहे. हरियाणात निवडणूक सुरु असतानाचा त्यांची वरिष्ठ नेता कुमारी शैलजा यांनी सांगिलं होतं की हरियाणात काँग्रेस जिंकणार नाही, कारण हरियाणातील काँग्रेस नेतेच पक्षाचा पराभवासाठी काम करत आहेत.” हरियाणा काँग्रेसचे अध्यक्ष राव नरेंद्र सिंह म्हणाले होते की, राज्यात काँग्रेसमध्ये समन्वय नाही. एकीकडे काँग्रेस नेते पराभवाला पक्षाला जबाबदार धरत आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधी पराभवासाठी निवडणूक आयोगाला जबाबदार धरत आहेत. इतक्या पराभवनांतर राहुल गांधी शिकायला तयार नाही, असे रिजीजू यांनी पुढे म्हणत राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
पुढे ते म्हणाले की, २००४ मध्ये सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपचा विजय अपेक्षित होता. पण, आम्ही निवडणूक हरलो, तेव्हा आम्ही कोणताही आवाज उठवला नाही, असे ते म्हणाले. त्यानंतर १० वर्षे यूपीए सरकार सत्तेत राहिले आणि आम्ही ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोलवर टीका केली नाही.
भाजपने राहुल गांधी यांच्या हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या एका क्लिपचा हवाला देत म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी एकदा म्हटले होते की, आम्ही निवडणुका जिंकू आणि आमची व्यवस्था चांगली आहे. ते म्हणाले की चांगली व्यवस्था म्हणजे कार्यकर्त्यांचे प्रेम, शिस्त आणि लोकांपर्यंत पोहोचणे.
हे ही वाचा:
मैदानात वादग्रस्त हावभाव करणाऱ्या हारिस रौफवर दोन सामन्यांची बंदी
चाचणी दरम्यान मोनोरेलचा अपघात; डबा रूळावरून घसरला
बिहारमध्ये एनडीए पुन्हा दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करेल
“मदरसा शब्दावर आक्षेप नाही!” उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी असे का म्हणाले?
रिजिजू पुढे म्हणाले की, “आता राहुल गांधी म्हणत आहेत की, हे सर्व बिहारमध्ये होईल. मतदार यादी शुद्ध झाल्याबद्दल बिहारमधील जनता आनंदी आहे. राहुल गांधी येथे मते कापल्याबद्दल बोलत आहेत. राजद नेतेही राहुल गांधींबद्दल बोलत नाहीत. मतदानाच्या वेळी प्रत्येक राजकीय पक्षाचा एक मतदान एजंट असतो. मतदान एजंट मतदान केंद्रावर राहतात आणि मतदान करणाऱ्या मतदारांची तपासणी करतात. आता, जर काँग्रेसकडे मतदान एजंट नसेल तर त्यांनी कळवावे की ते मतदान एजंट ठेवू शकले नाहीत. मतदानानंतर काही अनियमितता आढळल्यास ते निवडणूक आयोगाकडे अपील करू शकतात. त्यानंतरही न्याय मिळाला नाही तर ते न्यायालयात जाऊ शकतात.”







