29 C
Mumbai
Thursday, July 9, 2026
घरक्राईमनामाश्रद्धेचा पैसा लुटून उभारली कोट्यवधींची संपत्ती!

श्रद्धेचा पैसा लुटून उभारली कोट्यवधींची संपत्ती!

राम मंदिर देणगी प्रकरणाने देश हादरला

Google News Follow

Related

अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत आरोपींची आर्थिक स्थिती अवघ्या काही महिन्यांतच मोठ्या प्रमाणात बदलल्याचे उघड झाले आहे. केवळ १४ ते १८ हजार रुपये मासिक पगारावर काम करणाऱ्या काही आरोपींनी अयोध्येत स्वतःची घरे, आलिशान एसयूव्ही गाड्या आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता उभी केल्याचे तपासात समोर आले आहे.

तपास यंत्रणेनुसार, राम मंदिरात भाविकांकडून येणाऱ्या देणगीतील रोकड मोजणी प्रक्रियेदरम्यान संगनमत करून दररोज सुमारे ६ ते ८ लाख रुपयांची अफरातफर केली जात होती. या पैशांचा वापर करून आरोपींनी जमीन, घरे, महागड्या गाड्या आणि इतर स्थावर मालमत्ता खरेदी केली. त्यांच्या बँक खात्यांमधील व्यवहारही उत्पन्नाच्या तुलनेत संशयास्पदरीत्या जास्त असल्याचे निष्पन्न झाले आहे.
हे ही वाचा:
नौदलाला मिळाले स्टेल्थ कवच; चीन्यांचा चडफडाट

समुद्राने वेढलेला विमानतळ तोही पालघरमध्ये?

चला निघुया !! धबधब्यांचा उत्सव पाहुया ! | Explore Maharashtra | Waterfalls |

विनय सहस्त्रबुद्धे एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष; केतकरांचा पराभव

SIT आता आरोपींची बँक खाती, मालमत्तेचे व्यवहार, आर्थिक गुंतवणूक आणि पैशांचा संपूर्ण प्रवाह तपासत आहे. तपासादरम्यान अनेक मालमत्ता शोधून काढण्यात आल्या असून, उत्पन्नाशी विसंगत आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी आयकर विभाग तसेच इतर केंद्रीय यंत्रणांचीही मदत घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, देणगी मोजणी प्रक्रियेशी संबंधित काही कर्मचारी आणि इतर व्यक्तींचीही चौकशी सुरू आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे आणखी काही जणांचे या गैरव्यवहाराशी संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे राम मंदिरातील देणगी व्यवस्थापन आणि पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, संबंधित यंत्रणांकडून जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा