33 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरक्राईमनामाचार वर्षांत चार वेळा लग्न करून बांगलादेशी महिलेने उकळले पैसे

चार वर्षांत चार वेळा लग्न करून बांगलादेशी महिलेने उकळले पैसे

मेडिकल व्हिसावर मिळवायची भारतात प्रवेश

Google News Follow

Related

एका बांगलादेशी महिलेने चार वर्षांत चार लग्न करून पैसे उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रकरणात पश्चिम बंगालच्या बिधाननगर पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. साहना सादिक (वय ३२ वर्षे) असे या महिलेचे नाव असून ती मेडिकल व्हिसा वापरून भारतात यायची अशी माहिती समोर आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये ३२ वर्षीय साहना या बांगलादेशी महिलेने चार वर्षात तब्बल चार लग्न करून कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. मेडिकल व्हिसावर साहना भारतात यायची आणि भारतातील तरुणांशी लग्न करायची. त्यानंतर त्या तरुणावर घरगुती हिंसाचाराचा आरोप करून ब्लॅकमेल करायची आणि पैसे उकळायची. गेल्या चार वर्षांत सहा वेळा तिने भारताची सीमा ओलांडली आहे.

बनावट कागदपत्रांच्या मदतीने साहना हिने चार वेळा लग्न केलं. यापैकी एकाही विवाहाची अधिकृत नोंद कुठेही करण्यात आलेली नाही. माहितीनुसार, तिने कोलकात्याच्या राजारहाट आणि न्यू टाऊन भागातील पतींवर घरगुती हिंसाचाराचे गुन्हे दाखल केलेले आहेत. यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये साहना हिने तिच्या पतीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करत पतीने तिचे आक्षेपार्ह फोटो काढल्याचा दावा केला होता. दरम्यान, या महिलेला आधीही पाहिल्याचे पोलिसांना लक्षात येताच त्यांनी महिलेचं पूर्वीचं रेकॉर्ड तपासलं. यावेळी असे आढळून आले की, ती यापूर्वीही अनेकवेळा अशाच आरोपांवरून पोलीस ठाण्यात आली होती.

हे ही वाचा :

दिल्लीनंतर बिहारमध्ये भूकंपाचा धक्का; ४ रिश्टर स्केलची तीव्रता

बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ची डरकाळी; तीन दिवसांत १०० कोटींचा टप्पा पार

११२ अनधिकृत भारतीयांची तिसरी तुकडी अमृतसरमध्ये दाखल

दिल्लीला ४.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; पंतप्रधान मोदींकडून सतर्कतेचे आवाहन

एका कर्मचाऱ्याने सांगितले की, “जेव्हा ही महिला तक्रार दाखल करण्यासाठी आली, तेव्हा ती ओळखीची वाटत होती. त्यामुळे संशय आला आणि आम्ही तिचं पूर्वीचं रेकॉर्ड तपासलं. तेव्हा आमच्या लक्षात आलं की तिने यापूर्वीही अशाच तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेची चौकशी केली आणि हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा