32 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
घरक्राईमनामा'द केरळ स्टोरी'बद्दल चांगलं लिहिलं म्हणून तरुणाला केली मारहाण

‘द केरळ स्टोरी’बद्दल चांगलं लिहिलं म्हणून तरुणाला केली मारहाण

'द केरळ स्टोरी' या चित्रपटाबद्दल सकारात्मक लिहिल्यामुळे मारहाण

Google News Follow

Related

राजस्थानमधील एका व्यक्तीला त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याने ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाबद्दल सकारात्मक लिहिल्यामुळे मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच त्याला धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तरुणींनी हा चित्रपट पाहावा यासाठी हा तरुण आग्रह करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) सदस्य असलेल्या पीडित व्यक्तीने मंदिर पोलिस ठाण्यात मारहाण प्रकरणी तीन जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. शनिवारी रात्री घरी परतत असताना संबंधित तरुणाला तीन जणांनी रस्त्यात अडवले. व्हॉट्सऍप स्टेटसवर चित्रपटाचे कौतुक करून समाजाचा अपमान केल्याचे सांगत त्याला जाब विचारण्यात आला. त्यानंतर मारहाण करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) देरावर सिंग यांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचा:

‘द केरळ स्टोरी’च्या टीमचे आयुष्य पूर्वीसारखे राहणार नाही, असं विवेक अग्निहोत्री का म्हणाले?

लष्करी परेडवर केलेल्या हल्ल्याबद्दल तेहरानमध्ये इराणी-स्विडिश नागरिकाला फाशी

ऑनलाइन घोटाळे करण्यासाठी केली होती एक हजार लोकांची तस्करी

जंतरमंतरची वाटचाल शाहीन बागेकडे

‘द केरळ स्टोरी’चा टीझर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज झाला आणि त्यानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. हा चित्रपट केरळमधील धार्मिक प्रवृत्ती आणि कट्टरपंथी इस्लामिक धर्मगुरूंकडून हिंदू आणि ख्रिश्चन महिलांना कशा प्रकारे लक्ष्य केले जात आहे यावर आधारित आहे. वादात अडकलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा