कर्नाटकातील बेंगळुरूमधील एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये बलात्कारची घटना घडली आहे. या प्रकरणी एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली असून जीवन गौडा असे त्याचे नाव आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. जीवन याने त्याच्या सिनिअर असलेल्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
एफआयआरनुसार, पीडित मुलगी, ही सातव्या सेमिस्टर बी.टेकची विद्यार्थिनी असून ती जवळजवळ तीन महिन्यांपासून जीवनला ओळखत होती. १० ऑक्टोबर रोजी, जीवन याने पीडित तरुणीला जेवणाच्या वेळी अनेक वेळा फोन करून आर्किटेक्चर ब्लॉकजवळ भेटण्यास सांगितले. जेव्हा ती त्याला भेटली तेव्हा त्याने तिचे जबरदस्तीने चुंबन घेतले, तिला पुरुषांच्या वॉशरूममध्ये ओढले, दार बंद केले आणि दुपारी १.३० ते १.५० दरम्यान तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी पळून गेली आणि तिने तिच्या पालकांना कळवण्यापूर्वी मैत्रिणींना सांगितले. १५ ऑक्टोबर रोजी औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, या घटनेनंतर आरोपीने तिला फोन करून विचारले की, तिला गोळीची गरज आहे का?
पोलिसांनी सांगितले की, या घटनेमध्ये तपासासाठी कोणतेही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नाही, परंतु फॉरेन्सिक टीम डिजिटल आणि इतर पुराव्यांची तपासणी करत आहेत. आरोपी आणि पीडित दोघेही एकाच विभागात होते आणि ही घटना कॅम्पसच्या आवारात घडली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ज्या मजल्यावर ही घटना घडली त्या मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, ज्यामुळे तपास गुंतागुंतीचा झाला आहे.
हे ही वाचा..
पाक संरक्षण मंत्री म्हणतात, दोन आघाड्यांवर युद्धासाठी तयार!
कॅनडा, अमेरिकेतील विमानतळांवर सायबर हल्ला; हमास समर्थनार्थ संदेश प्रसारित
भंगार विक्रेत्याकडून लाच घेणारा पंजाबचा डीआयजी अटकेत
राहुरीचे भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन
महाविद्यालयीन परिसरात घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हनुमंतनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले. त्यांनी सांगितले की प्रत्येक बाजूने चौकशी केली जाईल आणि जबाबदार असलेल्यांची चौकशी केली जाईल.







