भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी आणि विशेषतः हवाई दलासाठी शुक्रवार, १७ ऑक्टोबर हा दिवस विशेष ठरला. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित हलके लढाऊ विमान (LCA) तेजस MK1-A ने यशस्वीरीत्या आपले पहिले उड्डाण केले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) यांनी विकसित केलेल्या या अत्याधुनिक विमानामुळे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या उपक्रमाला अधिक बळकटी मिळाली आहे. या ऐतिहासिक प्रसंगी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते.
राजनाथ सिंह यांनी हिंदुस्तान टर्बो ट्रेनर (एचटीटी) च्या दुसऱ्या उत्पादन लाइनचे आणि तेजस मार्क १ए च्या तिसऱ्या उत्पादन लाइनचे उद्घाटन केले. महाराष्ट्रातील नाशिक येथे तेजस MK1-A चे उड्डाण झाले. या वेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे उपस्थित होते. विमानाने यशस्वी उड्डाण केल्यानंतर त्याचे वॉटर कॅनन सलामीने स्वागत करण्यात आले. अनेक वर्षांपासून भारतीय वायुसेनेला या विमानाची प्रतीक्षा होती आणि अखेर प्रतीक्षा संपली आहे.
भारतीय बनावटीचे तेजस विमान सर्वात हलके लढाऊ विमान आहे. ताशी २००० किलोमीटर वेग आणि हवेतच इंधन भरण्याची क्षमता आहे. विमानात ५०,००० फूट उंचीपर्यंत सहज उड्डाणाची क्षमता आहे. तसेच सर्व दिशांनी लक्ष्य साधण्याची क्षमता आहे. सर्व प्रकारच्या हवामानात हे विमान उड्डाण करू शकते. AESA रडारमुळे एकाच वेळी अनेक लक्ष्य ओळखणे आणि ट्रॅक करणे शक्य होणार आहे.
हे ही वाचा :
पाक संरक्षण मंत्री म्हणतात, दोन आघाड्यांवर युद्धासाठी तयार!
कॅनडा, अमेरिकेतील विमानतळांवर सायबर हल्ला; हमास समर्थनार्थ संदेश प्रसारित
दिवाळी : भारतातील नव्हे जगभरातील नीतिमूल्यांचा, श्रद्धांचा उत्सव !
उलटे स्वस्तिक बनविणाऱ्या भक्तांच्या मनोकामना होतात पूर्ण
तेजस मार्क १ए च्या हवाई दलात समावेशाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही, परंतु एचएएलच्या म्हणण्यानुसार लवकरच हे विमान हवाई दलात समाविष्ट केले जाईल. पुढील चार वर्षांत भारतीय हवाई दलाला ८३ तेजस मार्क १ए विमानांचे वितरण पूर्ण करण्याचे एचएएलचे उद्दिष्ट आहे.







