30.6 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरक्राईमनामाबँक कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला; बँकेतून १२ कोटी २० लाख रुपयांची रोकड लंपास

बँक कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला; बँकेतून १२ कोटी २० लाख रुपयांची रोकड लंपास

Google News Follow

Related

आय.सी.आय.सी.आय (ICICI) बॅंकेच्या शाखेतून तब्बल १२ कोटी २० लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवलीमध्ये ही घटना घडली असून चोरीचे कोट्यवधी रुपये चोरांनी आठवडाभर मुंब्रा परिसरात टेम्पोत लपवून ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा परिसरातील आय.सी.आय.सी.आय बॅंकेच्या शाखेतून १२ कोटी २० लाख रुपयांची रोकड लंपास झाली आहे. बॅंकेला ९ आणि १० तारखेला सुट्टी होती. त्यानंतर ११ जुलैला, या बॅंकेमधील सीसीटीव्ही यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याचे, बॅंकेच्या लक्षात आले. त्यानंतर संबंधित बॅंक प्रशासनाने टेक्निकल टीमला संपर्क साधला आणि दुरुस्ती करून घेतली. १२ तारखेला सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता काही फुटेज डिलीट असल्याचे आढळले.

त्यानंतर बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी पैसे ठेवण्याची जागा तपासली असता, त्यातली ३४ कोटी रुपये गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कार्यालय तपासले असता, सुरक्षा रक्षकाला पैशांनी भरलेल्या काही बॅग्स आढळून आल्या. या बॅग्समध्ये ३४ कोटींपैकी २२ कोटी रुपये आढळून आले. तसेच, या पैशांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेला कर्मचारी अल्ताफ शेख हा देखील गायब असल्याचे लक्षात आले. या चोरीमागचा मुख्य आरोपी अल्ताफ असून, तो सध्या फरार आहे. उर्वरीत रक्कम त्याच्याकडे असू शकते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

मंत्रिपद देतो म्हणत भामट्यांनी आमदारांकडे मागितले १०० कोटी

राहुल शेवाळे शिवसेनेचे गटनेते, तर भावना गवळी मुख्य प्रतोद

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकाच्या मुसक्या आवळल्या

लोकसभा अध्यक्ष संतापले; ही सदस्यांची दुटप्पी वृत्ती

या प्रकरणी ठाणे मालमत्ता गुन्हे पोलिसांनी चौघांपैकी तिघांना मुंब्रा परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. टेम्पोमधून ५ कोटी ८० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मुख्य आरोपी अजूनही फरार असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा