ऑनलाईन प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमधील विषय आणि त्यातील भाषा यावरून वाद सुरू असताना आता कॉमेडियन मुनावर फारुकी हा देखील अडचणीत सापडला आहे. कॉमेडियन मुनावर फारुकी हा जिओ हॉटस्टार या ओटीटी मंचावरील ‘हफ्ता वसूली’ या कार्यक्रमातून सध्या प्रेक्षकांच्या भेटील येत आहे. दरम्यान या कार्यक्रमाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी झालेल्या तक्रारीनंतर तो कायदेशीर अडचणीत सापडला आहे.
वकील अमिता सचदेवा यांनी आरोप केला की, ‘हफ्ता वसूली’ हा कार्यक्रम अश्लीलतेला प्रोत्साहन देतो असून धार्मिक भावना दुखावत आहे. एक्सवर त्यांनी त्यांच्या तक्रारीची एक प्रत शेअर केली आहे. त्यांनी भारतीय न्याय संहिता कलम १९६, २९९ आणि ३५३, आयटी कायदा आणि इतर लागू कायद्यांनुसार एफआयआर दाखल करण्याची विनंती करणाऱ्या ईमेलचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की ओटीटी शो अनेक धर्मांचा अपमान करतो, सांस्कृतिक मूल्यांचे उल्लंघन करतो आणि तरुणांच्या मनावर आणि समाजावर नकारात्मक परिणाम करतो.
“मुनावर फारुकी विरोधात तक्रार दाखल! जिओ हॉटस्टारवर प्रसारित होणाऱ्या ‘हफ्ता वासुली’ शोबद्दल मी नेहमीचा गुन्हेगार मुनावर फारुकी विरोधात अधिकृतपणे तक्रार दाखल केली आहे, ज्यामध्ये बीएनएस कलम १९६, २९९ आणि ३५३, आयटी कायदा आणि इतर संबंधित कलमांसह एफआयआर दाखल करण्याची विनंती केली आहे. अश्लीलतेला प्रोत्साहन देणे, अनेक धर्मांचा अपमान करणे, सांस्कृतिक मूल्यांचे उल्लंघन करणे, तरुणांचे मन आणि समाज प्रदूषित करणे. तक्रार ईमेलद्वारे पाठवण्यात आली आहे आणि ती सोमवारी प्रत्यक्ष सादर केली जाईल आणि स्पीड-पोस्ट केली जाईल. जर कोणतीही कारवाई झाली नाही, तर न्याय मिळावा यासाठी मी न्यायालयात जाईन,” असे अमित सचदेवा यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
🚨 Complaint Filed Against Munawar Faruqui (@munawar0018)! 🚨
I have officially filed a complaint against habitual offender Munawar Faruqui, for his show "Hafta Wasooli" streamed on @JioHotstar, requesting an FIR under BNS Sections 196, 299, and 353, along with the IT Act and… pic.twitter.com/ps6NCH5Ztd
— Amita Sachdeva, Advocate (@SachdevaAmita) February 22, 2025
हे ही वाचा:
USAID मधील २००० पदे रद्द; हजारो कर्मचारी पगारी रजेवर
विराटचा विजयी चौकार आणि पाकिस्तान सीमापार
बागेश्वर धाम: पंतप्रधान मोदी म्हणाले, श्रद्धेचे केंद्र आता आरोग्याचे केंद्र बनणार!
तेलंगणात शिवरायांच्या पुतळ्यावर प्लास्टिक टाकत अनावरण रोखले, पण वारा आला आणि…
याशिवाय हिंदू जनजागृती समितीनेही एक्सवर एक पोस्ट शेअर करत या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. हिंदू जनजागृती समितीने म्हटले आहे की, जिओ हॉटस्टारवर सुरू असलेले ‘हफ्ता वसूली’ कार्यक्रमाचे प्रसारण तात्काळ बंद करण्यात यावे. या कार्यक्रमात मुनावर फारुकी अश्लील भाषेचा वापर करत असून ही भाषा सार्वजनिक पाहण्यासाठी अस्वीकार्य आहे. यामुळे नैतिक मूल्यांना धक्का बसत असून स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनी जबाबदारीने वागले पाहिजे.
We demand an immediate ban on #HaftaVasooli airing on Jio Hotstar! In this show @munawar uses foul language, which is unacceptable for public viewing. It sinks moral values. Streaming platforms must act responsibly! @JioHotstar @MIB_India #JioHotstar_Ban_HaftaVasooli… pic.twitter.com/NZpvlUtiOQ
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) February 22, 2025