दिल्लीतील साहित्य संमेलनात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या आरोपांवर महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्यांनी उत्तर दिले नसून शरद पवार हे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. परंतु, ते या विषयावर गप्प आहेत. यावरून त्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. या प्रकरणात शरद पवार आपली जबाबदारी नाकारु शकत नाहीत. ते सुद्धा याला जबाबदार आहेत, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे.
संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी देशाच्या राजधानीत साहित्य संमेलन भरवले आहे का? साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर झालेल्या राजकीय चिखलफेकीची जबाबदारी शरद पवार नाकारु शकत नाहीत. शरद पवार यांनी निषेध करायला हवा. ते शांत कसे राहू शकतात. त्यांच्यावर चिखलफेक होते तेव्हा आम्ही उभे राहतो ना? नीलम गोऱ्हे कोण बाई आहेत, कोणते भूत आहे. हे साहित्य संमेलन नव्हतेच, त्यात राजकारण झाले,” अशी टीका करत त्यांनी शरद पवारांच्या शांत राहण्यावर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांनीही निषेध व्यक्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हे ही वाचा:
‘हफ्ता वसूली’ कार्यक्रमात सांस्कृतिक मूल्यांचे उल्लंघन केल्याबद्दल मुनावर फारुकी विरुद्ध तक्रार
USAID मधील २००० पदे रद्द; हजारो कर्मचारी पगारी रजेवर
विराटचा विजयी चौकार आणि पाकिस्तान सीमापार
बागेश्वर धाम: पंतप्रधान मोदी म्हणाले, श्रद्धेचे केंद्र आता आरोग्याचे केंद्र बनणार!
संजय राऊत यांनी यावेळी साहित्य महामंडळावरही आरोप केले. साहित्य महामंडळ खंडणी घेऊन संमेलन भरवत आहे. सरकारने दोन कोटी दिले तर २५ लाख खंडणी म्हणून काढून घेण्याचे काम साहित्य महामंडळ करत आहे. संमेलन अध्यक्षा उषा तांबे कोण आहेत? ते माहीत नाही. त्यांचे मराठी साहित्यात काय योगदान आहे? उषा तांबे यांचे पती पीडब्लूडी विभागात सचिव होते. ते सर्वात भ्रष्ट खाते आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.