32 C
Mumbai
Monday, June 21, 2021
घर क्राईमनामा वाझेला ठेवलेल्या तळोजासह सहा कारागृहे कोरोनाच्या कैदेत

वाझेला ठेवलेल्या तळोजासह सहा कारागृहे कोरोनाच्या कैदेत

Related

राज्यातील लहान मोठे असे ४७ कारागृहापैकी ६ कारागृहाची परिस्थिती कोरोनामुळे भयानक झाली आहे. या सहा कारागृहापैकी, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात सर्वाधिक कैद्यांना कोरोनाची लागण झाली असून त्या खालोखाल ठाणे, कल्याण,तळोजा आणि भायखळा महिला कारागृहात कोरोनाचे रुग्ण वाढले असून त्यात गेल्या वर्षभरात २२ जणांचा मृत्यू झाला असून त्यात ९ कर्मचारी यांचा समावेश आहे. कारागृहात वाढत्या कोरोना संक्रमणामुळे कारागृह प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मुख्य म्हणजे बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे, रियाझ काझी यांना ज्या तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे, तिथेही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

हे ही वाचा:

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढणार?

‘सोशल’ दबावामुळे अखेर ‘सोशल’ उधळपट्टीचा निर्णय रद्द

मेट्रोची चाचणी मे महिन्याच्या अखेरीस

उद्यापासून २ हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असतांना कोरोनाचा शिरकाव राज्यातील कारागृहात देखील मोठ्या प्रमाणात झाला आहे. काही आठवड्यापूर्वी मुंबईतील भायखळा महिला कारागृहात शीना बोरा हत्या प्रकरणात कैद असलेल्या इंद्राणी मुखर्जी हिच्या सह ३९ महिला कैदीना कोरोना झाला होत, त्यात इंद्राणीसह ८ महिला कैदी बरे झाले असून ३१ एक्टिव्ह रुग्ण आहेत. भायखळा महिला कारागृहाच्या क्षमता २६२ कैद्यांची असून त्या ठिकाणी २९३ कैदी आहेत.

आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात ३०४ कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यापैकी २९८ कैदी बरे झाले असून ६ जण अद्यापही कोरोना संक्रमित आहेत. आर्थर रोड कारागृहाची क्षमता ८०४ कैद्यांची आहे,मात्र या ठिकाणी २९०२ कैदी ठेवण्यात आले आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात ११७ कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यापैकी ७४ कैदी कोरोनातून बरे झाले असून ४३ कैदी कोरोना संक्रमित आहेत.११०५ कैद्यांची क्षमता असलेले ठाणे कारागृहात सध्या ३७०९ कैदी आहेत.

नवी मुंबईतील तळोजा कारागृहा मात्र कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या महिन्यात तळोजा कारागृहात एक ही कैदी कोरोना संक्रमित नव्हता मात्र एका महिन्यातच या ठिकाणी कोरोनाचे २१ रुग्ण आढळून आले आहे. त्यात एकाचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असून १४ कैदी अजून देखील संक्रमित आहे. तळोजा कारागृहाची कैद्यांची क्षमता २१२४ असून सद्यस्थितीत या ठिकाणी ३००२ कैदी आहेत. यामध्ये बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, निलंबित पोलीस अधिकारी सुनील माने, रियाजुद्दीन काझी यांना देखील तळोजा कारागृहात ठेवण्यात आलेले आहेत. त्याच बरोबर गँगस्टर देखील तळोजा कारागृहात कैदेत आहेत. कल्याणच्या आधारवाडी कारागृहात १५१कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यापैकी १३१ कैदी बरे झाले असून २० रुग्ण आहेत. ५४० कैद्याची क्षमता असलेल्या कल्याणच्या कारागृहात १८७०कैदी आहेत.

कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात सर्वात भयानक परिस्थिती असून १९२ जणांना कोरोनाची लागण झाली होती,७४ कैद्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. राज्यातील कारागृहात वाढत्या कोरोना संक्रमण मुळे कारागृह प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा