26 C
Mumbai
Friday, September 29, 2023
घरक्राईमनामागोरक्षक मोनू मानेसर राजस्थान पोलिसांच्या ताब्यात

गोरक्षक मोनू मानेसर राजस्थान पोलिसांच्या ताब्यात

Google News Follow

Related

हरियाणातील भिवानी येथे एका गाडीमध्ये दोन मुस्लिम पुरुषांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला होता. या दोघांच्या हत्येप्रकरणी राजस्थान पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये मोनू मानेसर आरोपी आहे. राजस्थान पोलिसांनी मंगळवारी गोरक्षक मोनू मानेसरला ताब्यात घेतले. मोनू मानेसरला हरयाणा पोलिसांनी अटक केल्यानंतर काही तासांत नूह न्यायालयाने हा आदेश दिला. मोनू मानेसर हा फेब्रुवारीमध्ये झालेल्या दोन मुस्लिम पुरुषांच्या हत्येतील आरोपी आहे. नासिर (२५) आणि जुनैद (३५) या दोन पुरुषांचे राजस्थानमधील भरतपूर येथून गोरक्षकांनी अपहरण केले होते आणि नंतर ते हरियाणातील भिवानी जिल्ह्यात एका जळलेल्या गाडीमध्ये मृतावस्थेत सापडले होते.

गोरक्षक मोनू मानेसर याला सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मंगळवारी अटक करण्यात आली. नंतर त्याला नूह न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. भिवानी दुहेरी हत्याकांडाच्या तपासासाठी राजस्थान पोलिसांनी मोनू मानेसरची कोठडी मागितली. नूह न्यायालयाने ती मान्य केली. मोनू मानेसर आता राजस्थान पोलिसांच्या ताब्यात असल्याचे त्याचे वकील सोम दत्त शर्मा यांनी सांगितले.

मोनू मानेसरला कशी अटक करण्यात आली, याबाबतची माहिती कॉन्स्टेबल मोहित यांनी दिली. ‘नूह सायबर क्राइम पोलिस सोशल मीडियावरील घडामोडींवर नजर ठेवत असताना मोनू मानेसरचे नाव समोर आले होते. एका फेसबुक पेजवर २६ ऑगस्टला जातीय तेढ वाढवणारी पोस्ट शेअर केली होती. अधिक तपास केल्यावर, या पृष्ठाशी संबंधित फेसबुक खाते मोहित उर्फ मोनू मानेसर या नावाने नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाशी जोडलेले असल्याचे उघड झाले. या पुराव्याच्या आधारे, मोनू मानेसर याला अटक करण्यात आली आणि त्याच्या सहकाऱ्यांचा शोध घेण्यात आला. त्याच्या पँटमध्ये लपवून ठेवलेले पॉइंट ४५ कॅलिबरचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे सापडली.

हे ही वाचा:

संशयास्पद चिनी बॅगवरून १२ तासांचे नाट्य

डीएमकेने स्पष्टच सांगितले की, सनातन धर्म नष्ट करणे हाच इंडी आघाडीचा उद्देश

ऋषी सुनक यांनी एकनाथ शिंदेंना भन्नाट किस्सा ऐकवला!

उद्धव ठाकरे हे केवळ मनोरंजन करणारे ‘विदूषक’ !

हरियाणा पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर, १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीसाठी नूह न्यायालयात अपील दाखल करण्यात आले. त्यानंतर, नूह न्यायालयाने विनंती मान्य करून मोनू मानेसरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर राजस्थान पोलिसांनी अटक केलेल्या त्याच्या कोठडीची मागणी केली. त्यानंतर नूह न्यायालयाने मोनू मानेसरला राजस्थान पोलिसांना हस्तांतरित करण्यास सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,034अनुयायीअनुकरण करा
101,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा