26 C
Mumbai
Friday, September 29, 2023
घरविशेषसंशयास्पद चिनी बॅगवरून १२ तासांचे नाट्य

संशयास्पद चिनी बॅगवरून १२ तासांचे नाट्य

Google News Follow

Related

जी २० शिखर परिषदेत मांडण्यात आलेल्या घोषणापत्रावर सर्व देशांचे एकमत होऊ शकेल की नाही, हे पाहण्यासाठी शहर उत्सुकतेने वाट पाहात असताना नवी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शांतपणे परंतु तणावपूर्ण नाटक घडत होते, ज्या नाटकाने गुप्तचर यंत्रणांना चांगलेच अडचणीत आणले.

‘ताज पॅलेस’ या हॉटेलमध्ये उतरलेल्या चिनी शिष्टमंडळाच्या एका सदस्याच्या बॅगचा आकार असामान्य होता. त्यामुळे या बॅगने सुरक्षा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र ‘राजनैतिक नियमा’चे पालन करून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शिष्टमंडळाला या बॅगा आत नेण्यास परवानगी दिली. मात्र, हॉटेलमधील कर्मचाऱ्याने हॉटेलच्या खोलीतील एका बॅगेमध्ये काही ‘संशयास्पद उपकरणे’ असल्याची तक्रार केली. त्यामुळे तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवण्यात आले. त्यांनी त्वरित सल्लामसलत केल्यानंतर, सुरक्षा अधिकाऱ्यांनी चीनच्या शिष्टमंडळाला बॅग स्कॅनरमध्ये ठेवण्यास सांगितले. त्यानंतर मात्र तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली.

चिनी सदस्य बॅगा देण्यास तसेच, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यातील वस्तू तपासण्यासाठी देण्यास तयार नव्हते. त्यामुळे ही परिस्थिती आणखी चिघळली. महत्त्वाचे म्हणजे चिनी शिष्टमंडळाने स्वतंत्र आणि ‘खासगी’ इंटरनेट कनेक्शन मागितले होते. मात्र, तसे देण्यास हॉटेलने नकार दिला.

अखेर, चीनच्या शिष्टमंडळाने हे उपकरण दिल्लीतील चीनच्या दूतावासात पाठवण्याचे मान्य केल्यानंतर १२ तासांच्या या नाट्यावर पडदा पडला. जी- २० शिखर परिषदेचे पुढचे यजमान ब्राझीलचे अध्यक्षही याच हॉटेलमध्ये थांबले होते. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केलेल्या उपकरणे तपासण्याच्या विनंतीला चिनी शिष्टमंडळाने नकार दिला. मात्र, भारतीय सुरक्षा दल आपल्या भूमिकेवर ठाम राहिले,’ या वृत्ताला ताज पॅलेसमधील सुरक्षेचा भाग असलेल्या सूत्रांनी दुजोरा दिला.

चिनी शिष्टमंडळाने तब्बल १२ तासांनंतर हे उपकरण चिनी दूतावासात नेण्यास मंजुरी दिली. मात्र, तोपर्यंत तीन सुरक्षा अधिकाऱ्यांचे पथक त्यांच्या हॉटेलच्या खोलीबाहेर खडा पहारा देत होते. हे उपकरण नेमके काय होते, ती हेरगिरी करणारी यंत्रणा होती का, याबाबत काहीच माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. सुरक्षा अधिकाऱ्यांना या उपकरणाची तपासणी करण्याची संधीच न मिळाल्याने ते उपकरण काय होते, हे आम्ही निश्चितपणे सांगू शकत नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा:

डीएमकेने स्पष्टच सांगितले की, सनातन धर्म नष्ट करणे हाच इंडी आघाडीचा उद्देश

ऋषी सुनक यांनी एकनाथ शिंदेंना भन्नाट किस्सा ऐकवला!

उद्धव ठाकरे हे केवळ मनोरंजन करणारे ‘विदूषक’ !

शेवटी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन झाले भारतातून जस्ट आऊट

एका गुप्तचर अधिकाऱ्याने या संदर्भात वरिष्ठांना अहवाल पाठवून ‘अशा उपकरणांचा वापर सामान्यतः सुरक्षित संपर्कसाधने ‘जॅम’ करण्यासाठी केला जातो,’ असे कळवले आहे. मात्र, सूटकेसमध्ये नेमके काय होते, हे एक गूढच राहिले आहे.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी जी २० शिखर परिषदेला हजर राहण्याचे टाळून त्याऐवजी पंतप्रधान ली कियांग यांना पाठवले. ली यांच्या आगमनाची घोषणा शेवटच्या क्षणी करण्यात आली होती. तसेच, ली हे ज्येष्ठ नेत्यांसाठी असलेल्या नेहमीच्या ‘विशेष विमाना’ने आले नाहीत, तर, चार्टर्ड फ्लाइटने पोहोचून त्यांनी भारतीय सुरक्षा यंत्रणांना आश्चर्याचा धक्का दिला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,034अनुयायीअनुकरण करा
101,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा