29.8 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरक्राईमनामामुजाहिद्दीनच्या फरार दहशतवाद्याच्या मुलीला मुंब्र्यातून अटक

मुजाहिद्दीनच्या फरार दहशतवाद्याच्या मुलीला मुंब्र्यातून अटक

एटीएसची मोठी कारवाई

Google News Follow

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यात मोठी कारवाई करत इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित फरार दहशतवादी तारिक खान याची २१ वर्षीय मुलगी नमीरा तारिक खान हिला मुंब्रा येथून अटक केली आहे. या कारवाईनंतर तपास यंत्रणांच्या हालचाली वाढल्या असून, नमीरा हिच्या परदेश प्रवासासह बनावट पासपोर्ट प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, नमीरा हिने चुकीची माहिती देऊन पासपोर्ट मिळवल्याचा संशय आहे. कुर्ला आणि लखनऊ येथील पत्त्यांच्या आधारे मिळालेल्या पासपोर्टचा वापर करून तिने दोन वेळा सौदी अरेबियाचा प्रवास केल्याचे समोर आले आहे. या प्रवासादरम्यान ती आपल्या फरार वडिलांना भेटली होती का, याचा तपास यंत्रणा करत आहेत. तसेच नमीरा सौदी अरेबियासोबत पाकिस्तानमध्येही गेली होती का, याचीही चौकशी सुरू आहे. तिची प्रवास कागदपत्रे, पासपोर्ट आणि इतर संबंधित माहिती तपासली जात आहे.

तपास यंत्रणा तारिक खानची पत्नी शबनम उर्फ फिरदौस तारिक खान हिचाही शोध घेत आहेत. शबनम फरार असल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान नमीरा आणि तिची आई काही दिवसांपासून मुंब्रा परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एटीएसने नमीरा हिच्यावर कारवाई करत तिला अटक केली. तारिक खानविरोधात प्रतिबंधित संघटना सिमी, इंडियन मुजाहिद्दीन, बनावट चलन, दहशतवादी कारवाया आणि देशविरोधी कारवायांसह अनेक गंभीर प्रकरणे दाखल असल्याचे सांगण्यात येते. तो गेल्या अनेक वर्षांपासून फरार आहे.

हे ही वाचा:

बांगलादेशला हरवून भारत आशिया कपच्या फायनलमध्ये!

साखरेचे दर भडकू नयेत म्हणून सरकार अलर्ट

स्थानिक चलनात व्यापाराला प्राधान्य

भारताच्या लेकींचा पाकिस्तानवर गोलवर्षाव!

कोण आहे तारिक खान?

तारिक खानचे पूर्ण नाव मोहम्मद तारिक अंजुमन हसन असून तो बिहारचा रहिवासी असल्याचे सांगितले जाते. तो व्यवसायाने स्थापत्य अभियंता असल्याची माहिती आहे. तपास यंत्रणांच्या दाव्यानुसार, तो १९९८ पासून प्रतिबंधित संघटना ‘सिमी’मध्ये सक्रिय होता. २००३ मध्ये रियाझ भटकल आणि इक्बाल भटकल यांच्यासोबत इंडियन मुजाहिद्दीनच्या स्थापनेत तो सहभागी असल्याचे सांगितले जाते. तपासात त्याचे नाव या संघटनेचा संस्थापक सदस्य आणि वैचारिक मार्गदर्शक म्हणूनही समोर आल्याचा दावा आहे. २००७ च्या आसपास पुण्यातील कोंढवा परिसरात इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित काही तरुणांना आश्रय आणि मदत केल्याच्या प्रकरणातही तारिक खानचे नाव समोर आले होते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा