30 C
Mumbai
Wednesday, May 18, 2022
घरक्राईमनामापुरोहितांना संरक्षण देण्याची अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची मागणी

पुरोहितांना संरक्षण देण्याची अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची मागणी

Related

अंबाजोगाई शेपवाडी येथे शनिवार, २ एप्रिल रोजी पुरोहित संतोष दुर्गादास पाठक (वय ५२) यांची हत्या करण्यात आली. पौराहित्य करण्यासाठी गेलेल्या पाठक यांच्यावर हनुमान मंदिरात एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला त्यात त्यांचा मृत्यू झाला. पाठक यांची निर्दयीपणे हत्या केल्यानंतर या घटनेतील आरोपी पांडुरंग अच्युत शेप (वय २७) हा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. या प्रकरणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

पुरोहित संतोष पाठक यांचा खून करणाऱ्या आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी, जेणेकरून यापुढे असे अनुसूचित प्रकार घडू नयेत आणि जाती जातीत तेढ निर्माण होऊन नयेत, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने पत्र लिहून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. तसेच पुरोहितांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणीही अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

चेतक: राष्ट्रसेवेची ६० गौरवशाली वर्षे

गतविजेत्या इंग्लंडला धूळ चारत ऑस्ट्रलियन महिलांनी सातव्यांदा उचलला विश्वचषक

पवन एक्सप्रेसचे चार डबे रुळावरून घसरले, एक ठार

काश्मिरी पंडितांनी श्रीनगरमध्ये साजरा केला ‘नवरेह’ सण

संतोष पाठक हे शेपवाडी येथील हनुमान मंदिराचे पुजारी होते. शनिवारी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे सकाळपासूनच पाठक गुरुजी हनुमान मंदिरात होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास एक माथेफिरू देवळात आला आणि त्याने संतोष पाठक यांच्यावर चाकूने हल्ला करायला सुरुवात केली. यावेळी गावातील काही महिलांनी हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र हा हल्लेखोर वार करतच राहिला. त्यानंतर गावकऱ्यांनी पाठक यांना त्वरित स्थानिक रुग्णालयात दाखल केले. पण तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान या हल्लेखोराला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,975चाहतेआवड दर्शवा
1,885अनुयायीअनुकरण करा
9,330सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा