30 C
Mumbai
Tuesday, May 17, 2022
घरराजकारण‘सलीम तुरुंगात गेला, आता जावेदही लवकरच जाणार’

‘सलीम तुरुंगात गेला, आता जावेदही लवकरच जाणार’

Related

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलेच राजकीय युद्ध रंगलेले पाहायला मिळत आहे. त्यातच केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात कारवाईचा सपाटा लावला आहे. दरम्यान भाजपा नेते मोहित कंभोज यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आता कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत. सलीम तुरुंगात गेला आता जावेदही जाणार असा इशारा कंभोज यांनी दिला आहे.

मोहित कंभोज यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “साडेतीन लोकांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार होतात. त्याचे काय झाले? बाप बेटे तुरुंगात जाणार होते? त्याचे काय झाले. भाजपाचे घोटाळे सांगणार होतात. त्याचे काय झाले?” असे सवाल मोहित कंभोज यांनी उपस्थित केले आहेत. संजय राऊत यांचे बोलणे मोठे असते पण दर्शन मात्र छोटे आहे, असा टोला मोहित कंभोज यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. सलीम गेला आहे आता जावेदही जाणार असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

श्रीलंकेत २६ मंत्र्यांनी दिला राजीनामा

नववर्षाचा पहिला दिवस ठरला शेवटचा! चाकूचे वार करत पुजाऱ्याचा खून

चेतक: राष्ट्रसेवेची ६० गौरवशाली वर्षे

गतविजेत्या इंग्लंडला धूळ चारत ऑस्ट्रलियन महिलांनी सातव्यांदा उचलला विश्वचषक

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आता दोन महिने होते आले. त्यात काही आरोप केले होते. पण त्याचं काय झालं पुढे? संजय राऊत आता कसे आहेत हे उघड झाले आहे, असे मोहित कंभोज ‘टीव्ही ९’शी बोलताना म्हणाले. सलीमनंतर आता जावेद तुरुंगात जाणार. यांनी गेल्या १० वर्षात आपल्या पदाचा गैरवापर केला आहे, अशी टीकाही मोहित कंभोज यांनी केली आहे. सलीम-जावेदची जोडी जास्त काळ वेगळी राहू शकत नाही, त्यांचे मिलन लवकरच होईल, असा खोचक टोलाही मोहित कंबोज यांनी लगावला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,978चाहतेआवड दर्शवा
1,882अनुयायीअनुकरण करा
9,320सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा