34 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरक्राईमनामा‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले

‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले

Google News Follow

Related

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रोनच्या भीतीने एका डॉक्टरने त्याच्या कुटुंबाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे घडली आहे. दोन मुलांचा आणि पत्नीचा जीव या डॉक्टरने घेतला असून डॉक्टर फरार आहे. या डॉक्टरने एक चिठ्ठी लिहिली असून त्याने परिवाराची हत्या का केली याचे कारण लिहिले आहे. ‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ असे या डॉक्टरने चिठ्ठीत लिहिले असून तो नैराश्येत असल्याचे वृत्त आहे.

शुक्रवारी कानपूरमधील कल्याणपूर येथे राहणाऱ्या डॉ. सुशील कुमार यांनी नैराश्येच्या भरात आधी धारधार शस्त्राने पत्नीला संपवले. त्यानंतर मुलाचा आणि मुलीची गळा दाबून जीव घेतला. त्यानंतर या कृत्याची माहिती त्याने आपल्या भावाला मेसेज करत दिली. मेसेजमध्ये नैराश्यात आपण हत्या केल्याचे सुशील याने म्हटले आहे.

हे ही वाचा:

१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या

दहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार

भारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य

राज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सुशील हा फरार झाला होता. तपासादरम्यान पोलिसांना एक डायरी मिळाली असून त्यामध्ये ‘आता हा ओमिक्रोन सर्वांना मारेल. अजून मृतदेह मोजायचे नाहीत. माझ्या निष्काळजीपणामुळेच मी करिअरच्या त्या टप्प्यावर अडकलो आहे. जिथून बाहेर पडणे आता अशक्य आहे. माझे कोणतेही भविष्य नाही. मी पूर्ण शुद्धीत आपल्या परिवाराला संपवत आहे. त्यानंतर स्वत:चेही आयुष्य संपवणार आहे. याला दुसरे कुणीही जबाबदार नाही,’ असे लिहिले आहे. पोलीस सुशील याचा शोध घेत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा