27 C
Mumbai
Friday, January 28, 2022
घरक्राईमनामा१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या

१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या

Related

सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून मॅट्रिमोनी साईटवरून लग्नाचे आमिष दाखवून तब्बल १२ महिलांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोराला मुंबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या भामट्याने १२ महिलांची फसवणूक करून लाखो रुपये उकळले होते. मुंबईच्या सायबर सेलने या आरोपीला अटक केली आहे. सतीश गरुड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सतीश हा त्याच्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा. ज्या महिलांना आधाराची गरज आहे किंवा ज्यांच्या घरातून लग्नासाठी दबाव आहे अशा महिलांशी मॅट्रिमोनी साईटच्या मदतीने संपर्क करून तो त्यांना भुरळ घालायचा. सतीश हा क्रिमिनल सायकोलॉजी आणि एलएलबीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देणार होता. २०१३ पासून त्याने १२ महिलांची फसवणूक केली असून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले आहेत.

हे ही वाचा:

दहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार

भारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य

राज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण

अख्तरांच्या दिव्याखाली अंधार

सायबर पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यावर लक्षात आले की, ३० वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना हा लक्ष्य करायचा. दरम्यान मॅट्रिमोनी साईटवरून महिलांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले असून महिलांनी काळजी घेण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,597अनुयायीअनुकरण करा
5,850सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा