29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरक्राईमनामाभारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य

भारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य

Google News Follow

Related

‘द हॅकर न्युज’ यांनी दिलेल्या अहवालानुसार पाकिस्तानी हॅकर्स हे भारत आणि अफगाणिस्तान मधील सरकारी विशेषतः लष्करी अधिकाऱ्यांच्या सोशल मीडिया खात्यांना लक्ष्य करत आहेत. लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य करून त्यांच्या फेसबुक, गुगल, ट्विटरवरून संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.

पोर्टलने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार “मालवेअरबाइट्स’चे नवीनतम निष्कर्ष हे ऍडव्हान्स परसिसस्टेन्स थ्रेट (एपीटी) गटाने वापरलेल्या नवीन युक्त्या आणि साधनांबद्दल तपशीलवार माहिती देतात. साइडकॉपी म्हणूनही या गटाला ओळखले जाते कारण दुसर्‍या गटाशी संबंधित व्हायरस चेनची नक्कल करण्याच्या प्रयत्नांमधून दिशाभूल केली जाते.

हे ही वाचा:

राज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण

अख्तरांच्या दिव्याखाली अंधार

दुसऱ्या कसोटीत किवींवर भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व

कर्नाटकनंतर गुजरातमध्ये ओमिक्रोनची एंट्री

साईडकॉपीद्वारे वापरल्या जाणार्‍या फाईल्स या बहुतांश वेळा संग्रहित फाईल्स असतात ज्यापैकी एक फाईल एम्बेड केलेली असते. LNK, Microsoft Publisher किंवा Trojanized Applications,’ असे मालवेअरबाइट्सचे संशोधक होसेन जाझी यांनी सांगितले आहे. एम्बेडेड फाईल्स या प्रामुख्याने अफगाणिस्तान आणि भारतातील सरकारी किंवा लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी तयार केल्या आहेत,’ असेही ते म्हणाले.

लष्करी अधिकारी, सरकारी अधिकारी यांना प्रेमाचे आमिष दाखवून फसवले जाते आणि त्यानंतर आवश्यक ती माहिती त्यांच्याकडून घेतली जाते, असे ‘द हॅकर न्युज’च्या अहवालात म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा