28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
घरक्राईमनामापत्नीचा छळ करणाऱ्या पतीने केले हे भयंकर कृत्य!

पत्नीचा छळ करणाऱ्या पतीने केले हे भयंकर कृत्य!

Related

कल्याणमध्ये घरगुती हिंसाचाराचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका विवाहित तरुणीचा पतीकडून अमानुष छळ सुरू होता.

पती फक्त पत्नीचा छळ करत नव्हता तर, पत्नीला सिगारेटचे चटकेही द्यायचा. या माथेफिरूने पत्नीला १५ महिन्यांच्या बाळासह घराबाहेरही काढले. सध्या ही तरुणी न्याय मिळवण्यासाठी पोलीस ठाण्यात चकरा मारत आहे.

अडीच वर्षांपूर्वी तरुणीचा मंत्रालयात खासगी स्वीय सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या संदीप चव्हाण या व्यक्तीसोबत विवाह झाला होता. संदीपचे याआधी लग्न झाले होते त्यामुळे त्याचा हा दुसरा विवाह होता. लग्नानंतर काही महिने पती- पत्नीचा संसार सुखाने चालू होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून संदीपला वाहन खरेदी करायचे होते. त्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये यासाठी त्याने पत्नीच्या मागे तगादा लावला होता.

हे ही वाचा:

उल्हासनगर कायदा-सुव्यवस्थेच्या नावाने उल्हास…घडली आणखी एक घटना!

बाप्पाला सुखरूप घरी पाठवणारे कोळी बांधव मानधनाविना!

धक्कादायक! वापरलेले तेल पुन्हा विकले जात आहे रस्त्यावरील खाद्यपदार्थ बनविण्यासाठी

‘सावरकर: विस्मृतीचे पडसाद’ पुस्तकाचे बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते प्रकाशन

पत्नीने पैसे आणले नाही म्हणून तो पत्नीवर अत्याचार करत होता. इतकेच नाही तर त्याने पत्नीला सिगारेटचे चटकेही दिले. त्यानंतर त्याने पत्नीला आणि दीड वर्षांच्या मुलाला घराबाहेर काढले, असे पीडीत तरुणीने ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. संबंधित प्रकरणाची तक्रार करण्यासाठी तरुणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गेली असता तिची तक्रार नोंदवून घ्यायला पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यावर हुंडाबळी, अत्याचार, विनयभंग अशा गंभीर स्वरूपाच्या कलमांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल होऊन १५ दिवस उलटले तरी अजून महिलेची वैद्यकीय तपासणी देखील पोलिसांनी केलेली नाही. यासंदर्भात पोलिसांनी त्यांची बाजू अद्याप स्पष्ट केलेली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,436अनुयायीअनुकरण करा
4,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा