31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेष...म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भरली खुल्या मैदानात शाळा!

…म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भरली खुल्या मैदानात शाळा!

Google News Follow

Related

पालिकेच्या मोकळ्या मैदानात नववी आणि दहावीची मुले भेटतात आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करून तिथे शिक्षकांकडून शिकवणी घेतात. एस. जी. बर्वे महानगरपालिका शाळेचे गणित शिक्षक गजानन घाटे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. घाटकोपरमधील पालिकेचे हे मैदान रिक्षा उभ्या करण्यासाठी आणि आता गणेश मूर्ती जमा करण्यासाठी वापरण्यात येत आहे. मात्र, आठवड्यातून दोन दिवस या मैदानात १०० हून अधिक मुलांसाठी शाळा भरते. ऑनलाईन शिक्षण घेण्यास अडचण येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाची सुरुवात झाली होती, पण काही काळातच या शिकवणीसाठी अनेक मुले जमू लागली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे शाळेची दारे बंद आहेत. खुल्या मैदानातील शाळेची कल्पना ही शाळेचे मुख्याध्यापक असलेले अंबरसिंग मगर यांची आहे. आठवड्यातून दोन वेळा नववी आणि दहावीचे विद्यार्थी वेगवेगळ्या गटात मैदानावर उपस्थित राहतात. शाळेतील शिक्षक या खुल्या शाळेत शिकवण्यासोबतच ऑनलाईन वर्गही घेतात. मंगळवार आणि शुक्रवार अशा दोन दिवसांसाठी मैदानात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना मैदानाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात सुरक्षित अंतर ठेऊन बसवले जाते. या शिकवणी दरम्यान मुलांच्या शंकांचे निरसन केले जाते तसेच त्यांच्याकडून काही स्वाध्याय सोडवून घेतले जातात.

हे ही वाचा:

सप्टेंबर अखेरपर्यंत असेल पावसाचा डेरा

‘सावरकर: विस्मृतीचे पडसाद’ पुस्तकाचे बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते प्रकाशन

बाप्पाला सुखरूप घरी पाठवणारे कोळी बांधव मानधनाविना!

पंजाबमध्ये ‘पंजा’चा गोंधळ सुरूच! सुखजिंदर रंधावांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत

दहावीच्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या उद्देशाने हे वर्ग सुरू केले, असे मुख्याध्यापक मगर यांनी सांगितले. युनिसेफने (UNICEF) भारत, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार विद्यार्थ्यांमध्ये कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत कमी आकलन आहे.

“ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी लेखनाची शैली विसरले आहेत. दहावीची परीक्षा ही लेखी असणार आहे, त्यामुळे लेखनाचा सराव असायला हवा. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी आळशी बनले असून आम्हाला या विद्यार्थ्यांना लेखनाची आणि गणित सोडवण्याची सवय लावण्यासाठी तीन महिने लागले,” असे गणिताचे शिक्षक घाटे यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले.

“घरात एकच मोबाईल फोन असून तो आई तिच्या कामासाठी वापरत असते. त्यामुळे मला शाळेसाठी ऑनलाईन उपस्थित राहता येत नाही. कधीतरी उपस्थित राहिल्यावर शाळेत काय शिकवले जाते हे समजत नाही,” असे मैदानावरील वर्गात उपस्थित विद्यार्थिनी पायाल हिने सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा