29 C
Mumbai
Wednesday, May 18, 2022
घरक्राईमनामा१९ कोटींच्या घबाडप्रकरणी पूजा सिंघल ईडीच्या अटकेत

१९ कोटींच्या घबाडप्रकरणी पूजा सिंघल ईडीच्या अटकेत

Related

बेकायदेशीर खाण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने मोठी कारवाई करत मोठं घबाड जप्त केलं होतं. झारखंडच्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या जवळच्या दोन व्यक्तींकडून जवळपास १९ कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी एकूण १८ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणी आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांना ईडीने अटक केल्याचे वृत्त आहे.

ईडीने केलेल्या कारवाईत एकूण १९ करोड ३१ लाख रुपये पूजा सिंघल यांच्या चार्टर्ड अकाऊंटंट सुमन कुमार यांच्याकडून जप्त केले तर १.८ कोटी रुपये हे दुसऱ्या ठिकाणावरुन जप्त करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल १७ तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी जबाब नोंदवण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

राणा दाम्पत्याची पुन्हा एकदा हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा

राजद्रोहाच्या सर्व खटल्यांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती!

बसपा नेत्याने अपहरण करून विकल्याचा विद्यार्थीनीचा आरोप

एलॉन मस्क यांनी केली ही मोठी घोषणा

ईडीने शुक्रवार, ६ मे रोजी केलेल्या कारवाईत २ हजार, ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांचे बंडल जप्त करण्यात आले होते तर या प्रकरणी ईडीने यापुर्वीच राम बिनोदप्रसाद सिन्हा यांना अटक केली होती. राम सिन्हा यांनी मनरेगाच्या २००७-०८ मधील निधीत १८ कोटींचा गैरव्यवहार केला होता. त्यानंतर ईडीने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. राम सिन्हा यांच्या चौकशी दरम्यान मनरेगाच्या निधीतील गैरव्यवहारात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे उघडकीस आली होती. त्यात आयएएस पूजा सिंघल यांचे नाव होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,978चाहतेआवड दर्शवा
1,883अनुयायीअनुकरण करा
9,330सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा