29 C
Mumbai
Wednesday, May 18, 2022
घरविशेषएलॉन मस्क यांनी केली ही मोठी घोषणा

एलॉन मस्क यांनी केली ही मोठी घोषणा

Related

प्रसिद्ध उद्योगपती आणि टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटर हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतला. त्यापूर्वी त्यांनी अनेकदा ट्विटरच्या काही निर्णयांवर टीका केली होती. त्यामुळे ट्विटरचे मालिक बनल्यानंतर एलॉन मस्क आता ट्विटरमध्ये कोणते बदल करणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.

दरम्यान, एलॉन मस्क हे एका कॉन्फरन्समध्ये बोलताना म्हणाले की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ट्विटरवर बंदी आहे ती उठवणार असल्याचे ते म्हणाले. ‘रॉयटर्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, एलॉन मस्क यांनी ही बंदी चुकीची असल्याचे म्हटले आहे. ट्विटरच्या वापरावर कायमस्वरुपी बंदी घालणं हा अगदीच दुर्मिळ उपाय असल्याचे एलॉन मस्क म्हणाले. खातं तात्पुरतं रद्द करणे हे चालू शकेल असही मत त्यांनी व्यक्त केलं.

हे ही वाचा:

बसपा नेत्याने अपहरण करून विकल्याचा विद्यार्थीनीचा आरोप

‘ ठाकरे सरकारविरोधात राज यांनीही लढावे’

महसूल गुप्तचर संचालनालयाने हाणून पाडले सोन्याच्या तस्करीचे प्रयत्न

‘आडनावांवरून पालिका कारवाई करते आहे का’?

ट्विटरच्या वापरावर कायमस्वरूपी बंदी ही चुकीचा संदेश देणारे आणि बॉट्सच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या खात्यांसाठी असायला हवी, असे एलॉन मस्क म्हणाले. एलॉन मस्क पुढे म्हणाले की, चुकीचे आणि वाईट ट्विट्स डिलीट करायला हवेत किंवा कोणाला दिसणार नाहीत, अशी सुविधा करायला हवी. ट्विटर हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. काही वर्षांपूर्वी ट्विटरने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही विधानांमुळे त्यांच्यावर बंदी घातली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,978चाहतेआवड दर्शवा
1,883अनुयायीअनुकरण करा
9,330सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा