एका अज्ञात व्यक्तीने डायल ११२ वर कॉल करून “मुंबई बॉम्बने उद्ध्वस्त केली जाईल” आणि काही संशयास्पद व्यक्ती शहरात घुसल्या आहेत, या आशयाचा कॉल करून खळबळ उडवून दिली आहे. रविवारी रात्री हा कॉल डायल ११२ या क्रमांकावर आला होता.
कॉल करणाऱ्याची ओळख पटविण्यात आली असून राजीव सिंग असे कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने आरोप केला की, त्याने जेजे मार्ग परिसरात दोन जणांचे संभाषण ऐकले होते, हे दोघे नियोजित बॉम्बस्फोटाबद्दल आणि कटात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या उपस्थितीबद्दल बोलले होते अशी माहिती पोलिसांना दिली.
हे ही वाचा:
बोरिवलीत दोन कुटूंबात तुफान हाणामारी, ३ ठार!
बांगलादेश: शेख हसीना यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला अटक!
सुधांशू त्रिवेदी यांच्या हस्ते टर्माईट्स, वामपंथी दीमक पुस्तकांचे प्रकाशन
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल उत्तर प्रदेशातील व्यावसायिकाला अटक
दरम्यान, तपास यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांना तात्काळ सतर्क करण्यात आले आणि दाव्याची पडताळणी करण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात आले. प्राथमिक चौकशीनंतर, हा कॉल खोटा असल्याचे निष्पन्न झाले. कॉल करणाऱ्या राजीव सिंगविरुद्ध खोटी माहिती पसरवणे आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित कलमांखाली त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
