अभिजित जोग यांच्या “डावी वाळवी’ या डाव्या विचारसरणीवर प्रहार करणाऱ्या पुस्तकाच्या इंग्रजी आणि हिंदीतील आवृत्त्या अनुक्रमे टर्माइट्स आणि वामपंथी दीमक या पुस्तकांचे प्रकाशन भाजपा नेते आणि खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्या हस्ते शनिवारी नवी दिल्लीत झाले. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सुधांशू त्रिवेदी यांनी भारत पाकिस्तान संघर्षावर परखड भाष्य केले आणि भारतातील विरोधकांची पोलखोल केली.
ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आपल्यापेक्षा मजबूत स्थितीत आहे. याचे कारण म्हणजे पाकिस्तानमधील सत्ताधारी पक्षातील असो की विरोधी पक्षातील नेता कुणीही सरकारवर, सेनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही, पण भारतात विरोधक सेनेला प्रश्न विचारतात. पाकिस्तानातील कोणत्याही व्यक्तीचे भारतातील माध्यमात मत घेतले जात नाही. पण आपल्याकडील मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्र्यांचे मत लगेच घेतले जाते. पाकिस्तानातील नेत्यांचे असे कोणतेही वक्तव्य नाही जे डोसियरमधये वापरले जाते. पण भारतातील नेत्यांची अशी अनेक वक्तव्ये डोझियरमध्ये घेतली जात आहेत. दिवंगत सीडीएस बिपिन रावत यांनी याला अडीच घरांची लढाई म्हटले होते. मला वाटते. देशाने सावध राहणे आवश्य आहे. सगळ्यांनी एकत्र होऊन पुढे वाटचाल केली पाहिजे. पंतप्रधानांनी आता खासदारांची सहा पथके तयार केली आहेत. हे खासदार परदेशात पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करणार आहेत.
हे ही वाचा:
ऑपरेशन सिंदूरच्या यशानिमित्त दिल्लीत भव्य ‘तिरंगा यात्रा’
पाकिस्तानकडून भारताची पुन्हा नक्कल, शिष्टमंडळ पाठवणार परदेशात !
शक्तिपीठ देवीपाटन मंदिरात पर्यटनाला चालना
खालच्या पातळीवरचे राजकारण काँग्रेसला संपवणार!
“डावी वाळवी” या बहुचर्चित पुस्तकाच्या भाषांतराचा मुद्दा अनेक दिवस चर्चेत होता. आनंद देवधर यांनी या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तेव्हा अभिजीत जोग म्हणाले की, हिंदी आणि इंग्लिश भाषांतरे झाली आहेत. त्यावर तिथे उपस्थित असलेले सुनील देवधर म्हणाले की, याचे प्रकाशन व्हायला पाहिजे. त्या भेटीनंतर दोन महिन्यातच हा कार्यक्रम शनिवारी नवी दिल्लीत पार पडला. दिल्लीत कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनात होणाऱ्या या प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉक्टर सुधांशु त्रिवेदी उपस्थित राहिले होते.
My Home India या संस्थेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे संयुक्त आयोजन करण्यात आले.
