28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरक्राईमनामानमाज पढण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी; ६ जण जखमी

नमाज पढण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी; ६ जण जखमी

Google News Follow

Related

सध्या राज्यात कोविडचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी लॉकडाऊन लागू आहे, त्यामुळे विविध धार्मिक स्थळांमध्ये जाण्यावर देखील मर्यादा आहेत. अशातच रमझान चालू असल्याने काही मुसलमान मशिदीत जाऊन नमाज पढत आहेत. नंदुरबारमध्ये अशाच प्रकारे नमाज पढण्यास गेलेल्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन ६ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत दोन्ही गटांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

रमझानमध्ये नमाज पढण्यास गर्दी झाल्यास कोरोना प्रसाराचा धोका वाढतो. हा धोका लक्षात घेऊन मशिदीत गर्दी करू नये असे सांगून नमाज पठण करण्यापासून रोखल्याने दोन मुस्लिम गटांत तुंबळ हाणामारी झाली आहे.

हे ही वाचा :

मुलुंडमध्ये रेकॉर्डब्रेक रक्तदान

ऑलिंपियन कुस्तीगीर सुशील कुमारचा शोध घेण्यासाठी ‘लूकआऊट’ नोटीस

संजय राऊतांची वैचारिक पातळी लक्षात आली… भूषणसिंह कडाडले

आमदार कांबळेंकडून आरोग्य अधिकाऱ्याला मिळाल्या शिव्या, धमक्या

हा प्रकार नंदुरबार शहरातील चिराग अली मशिदीसमोर घडला. सध्या याठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि हॉकी स्टिकनं हल्ला करत दोन्ही गटांनी एकमेकांची डोकी फोडली. या हाणामारीत दोन्ही गटातील ६ जण जखमी झाले आहेत तर पोलिसांनी अद्याप १२ जणांना अटक केली असून अन्य ९ जणांचा शोध घेतला जात आहे.

दैनिक पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, ८ मे रोजी रात्री शहरातील मुस्लीम बांधव चिराग अली मशिदीसमोर नमाज पठणासाठी जमले होते. यावेळी मशिदीसमोर गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याबरोबरच आतमध्ये एकावेळी फक्त पाच जणांनाच प्रवेश असल्याचे देखील सांगितले गेले. नमाज पठण करण्यापासून रोखल्यामुळे एक जमाव दुसऱ्या जमावावर धावून गेला. त्यानंतर काही काळा दोन्ही गटात बाचाबाची सुरू झाली आणि बघता बघता याचं रुपांतर तुंबळ हाणामारीत झालं.

तुम्ही आम्हाला नमाजासाठी मशिदीत जाण्यापासून रोखलं कसं काय? असा जाब विचारत एका गटाने लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि हॉकी स्टिकने दुसऱ्या गटावर हल्ला केला. तेंव्हा समोरच्या गटानेही प्रतिहल्ला चढवला. नमाज पठणावरून झालेल्या या हाणामारीत एकूण सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा