29.7 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरक्राईमनामाभाजप नेते मधु मंडल हत्येप्रकरणी तृणमूलच्या कमल मंडलसह पाच जणांना अटक

भाजप नेते मधु मंडल हत्येप्रकरणी तृणमूलच्या कमल मंडलसह पाच जणांना अटक

अटकेपासून वाचण्यासाठी बांगलादेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना कारवाई

Google News Follow

भाजप नेते मधु मंडल यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी बिधाननगर येथील टेक्नो सिटी पोलिसांनी तृणमूलचे नेते कमल मंडल यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. माहितीनुसार, कमल मंडल अटकेपासून वाचण्यासाठी बांगलादेशात पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना, पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गोपालनगरच्या बंगाओन येथील कल्याणपूर सीमावर्ती भागात ही अटक करण्यात आली.

राजारहाट-न्यू टाऊन विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विजयानंतर पश्चिम बंगालच्या न्यू टाऊन परिसरात एका विजय रॅलीदरम्यान, कमल मंडल आणि त्यांच्या साथीदारांनी मधू मंडल यांना मारहाण करून ठार केले होते. मधू मंडल यांचा मृतदेह चिखलाच्या एका ढिगाऱ्यात पडलेला आढळला. त्यांच्या कुटुंबीयांनी या हत्येसाठी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना जबाबदार धरले आहे. या हत्येमुळे परिसरात प्रचंड संताप उसळला, ज्यामुळे गावकऱ्यांनी कमल मंडल यांच्या निवासस्थानाची तोडफोड केली. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

हे ही वाचा:

पाणीहाटीमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर फेकले कच्चे बॉम्ब

तृणमूल कार्यकर्त्यांनी बसीरहाटमध्ये भाजप कार्यकर्त्यावर झाडली गोळी

मुख्यमंत्री मान यांच्या ओएसडीशी संबंधित छापे; रोकड भरलेल्या दोन बॅगा जप्त

दहशतवादाचा पराभव करण्याचा भारताचा निर्धार

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच, राज्यात निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचे भीषण स्वरूप पुन्हा एकदा दिसून आले आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते सुवेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक आणि निकटवर्ती चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तसेच आणखी एका भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार झाला. तर पाणीहाटीमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर कच्चे बॉम्ब फेकण्याच्या घटना झाल्याचे समोर आले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा