भोपाळसारखाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातून समोर आला आहे. येथे एक मुस्लिम तरुण हिंदू मुलींना कॉलेजमध्ये सोडण्याच्या बहाण्याने लक्ष्य करत असे आणि त्यांच्याशी मैत्री करत असे. त्यानंतर तो मुलींचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवत असे. हिंदू संघटनेच्या निषेधानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे.
इम्रान असे आरोपीचे नाव असून तो मथुरेतील भरतपूर गेटचा रहिवासी आहे. आरोपी इम्रान ऑटो चालक आहे. ऑटोमधून हिंदू मुलींना कॉलेजमध्ये सोडत असे आणि त्यांच्याकडून तो पैसेही घेत नसे. हळूहळू तो मुलींशी जवळीक वाढवून त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडवत असे. त्यानंतर मुलींचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून सोशल मिडीयावर शेअर करण्याची भीती घालत मुलींना ब्लॅकमेल करत असे.
रविवारी आरोपीने एक सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याने म्हटले कि काही महिन्यांपूर्वी कोणीतरी आम्हाला सांगितले होते की मुस्लिमांनी होळीला घराबाहेर पडू नये, त्याचप्रमाणे आमचे देखील तसेच म्हणणे आहे कि ज्याला कोणाला कुर्बानीचा त्रास असेल त्याने घराबाहेर पडू नये.
कुर्बानी तर दिली जाणारच, नाल्यांमधून रक्तही वाहताना दिसेल. व्हिडिओमध्ये एक महिला घरात मांस कापताना दिसत आहे. याशिवाय आरोपी इम्रानने व्हॉट्सअॅपवर एक स्टेटस टाकला, ज्यामध्ये त्याने लिहिले की मी काही लोकांच्या वयापेक्षा जास्त गर्लफ्रेंड बनवल्या आहेत. मी दोन वर्षांत २३ गर्लफ्रेंड बनवल्या. माझे लक्ष्य ५० होते.
हे ही वाचा :
मुख्य निवडणूक आयुक्त स्टॉकहोम येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत देणार भाषण
मॉस्को, पुतिन यांनी रशियन नौदल विकास धोरणाला दिली मंजुरी
प्रवाळांचे रक्षण करण्यासाठी काय शोधला नवा मार्ग ?
रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रा. लि. गेली उच्च न्यायालयात
आरोपी इम्रानचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हिंदू संघटनांनी पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी इम्रानला अटक करून तुरुंगात पाठवले. हिंदू संघटनांचे म्हणणे आहे की आरोपी इम्रान हिंदू असल्याचे भासवून हिंदू मुलींना भेटतो. नंतर तो त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतो आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवतो. तक्रारीनंतर पोलिसांनी सांगितले की, आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. तो मुलींना मोफत कॉलेजमध्ये सोडत असे. या बहाण्याने तो हिंदू मुलींशी जवळीक साधत असे. या प्रकरणी पुढील तपास आणि कारवाई सुरू आहे.
