29.9 C
Mumbai
Tuesday, October 20, 2026
घरक्राईमनामालाल किल्ला स्फोटप्रकरणातील 'टेरर मॉड्युल'चा पर्दाफाश

लाल किल्ला स्फोटप्रकरणातील ‘टेरर मॉड्युल’चा पर्दाफाश

आरोपपत्र दाखल, जैशच्या नावाचा वापर

Google News Follow

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोट प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी कारवाई करत १० आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. जम्मू-काश्मीर राज्य तपास यंत्रणा (SIA) ने आरोपपत्र सादर केले असून, त्यामध्ये कथित ‘डॉक्टर टेरर मॉड्यूल’ची भूमिका सविस्तर मांडण्यात आली आहे. हे प्रकरण १९ ऑक्टोबर रोजी श्रीनगरमधील नौगाम भागात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) कडून धमकीचे पोस्टर्स लावण्यात आल्यानंतर उघडकीस आले. या पोस्टर्सचा उद्देश सामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणे असा होता.

आरोपपत्रात आरिफ निसार डार, यासिर उल अशरफ भट, मकसूद अहमद डार, इरफान अहमद वागे (उर्फ ओवैस), जमीर अहमद अहंगर (उर्फ मुतलाशी), मुजमिल शकील गनई (उर्फ मुसैब), डॉ. आदिल अहमद राथर (उर्फ जावेद), डॉ. शाहीन सईद, तुफैल अहमद भट आणि डॉ. उमर उन नबी यांचा समावेश आहे. यापैकी डॉ. उमर उन नबी हा लाल किल्ला हल्ल्यातील आत्मघाती हल्लेखोर असल्याचे सांगण्यात आले आहे.

तपासात समोर आले आहे की, हा मॉड्यूल बंदी घातलेल्या ‘अन्सार-गझवात-उल-हिंद’ (AGUH) या संघटनेला पुन्हा सक्रिय करण्याच्या कटात सहभागी होता. अहवालानुसार, आरोपींनी एक गुप्त नेटवर्क उभारले होते, जे भरती, कट्टरपंथीकरण आणि देशभरात दहशतवादी हल्ल्यांची तयारी करत होते. या गटाने सुरक्षा यंत्रणांना गोंधळात टाकण्यासाठी जैश-ए-मोहम्मद (JeM) या नावाचा वापर केल्याचेही सांगितले जाते.

तपासात असेही आढळले की, या मॉड्यूलमध्ये उच्च शिक्षित व्यक्ती, विशेषतः वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोक सहभागी होते. त्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि संस्थात्मक साधनसंपत्तीचा कथित गैरवापर केला. ते डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे इस्लामी कट्टरतावादाचा प्रसार करत होते आणि स्फोटक तयार करण्याशी संबंधित कामांमध्ये गुंतले होते, असा आरोप आहे.

SIA च्या माहितीनुसार, आरोपींनी ट्रायअ‍ॅसिटोन ट्रायपेरॉक्साइड (TATP) या अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक स्फोटकाचा वापर करण्याची योजना आखली होती. या स्फोटकाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक दहशतवादी घटनांमध्ये वापर करण्यात आला आहे. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य आणि संबंधित उपकरणे जप्त करण्यात आली, ज्यावरून या कटाचा मोठा व्याप्ती आणि संभाव्य धोका स्पष्ट होतो.

हे ही वाचा:

‘रामायणा’वर वादग्रस्त विधान केल्याबद्दल प्रकाश राज यांच्यावर गुन्हा

इराण युरेनियमचा साठा सोपवण्यास सहमत

निदा खान आली समोर! गर्भवती असल्यामुळे जामीन द्या!

नोएडा कामगार आंदोलनामागे ‘पाकिस्तान लिंक’; नियोजित कट असल्याचे उघड

एजन्सीने दावा केला आहे की, पुराव्यांवर आधारित तपासाद्वारे संपूर्ण दहशतवादी नेटवर्क आणि त्याची सहाय्यक यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली आहे. डिजिटल फॉरेन्सिक, वैज्ञानिक विश्लेषण आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपींचा सहभाग सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा