32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरक्राईमनामाखलिस्तानी दहशतवादी रिंदाने तेलंगणामध्ये पाठवले आरडीएक्स

खलिस्तानी दहशतवादी रिंदाने तेलंगणामध्ये पाठवले आरडीएक्स

Google News Follow

Related

खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंदाने तेलंगणामध्ये आरडीएक्स पाठवले असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. स्लीपर सेलच्या मदतीने हरविंदर याने आरडीएक्स पाठवले असल्याचे समजत आहे.सुरुवातीला हे आरडीएक्स नांदेडमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती होती,पण नंतर असे समोर आले हे आरडीएक्स तेलंगणामध्ये पाठवण्यात आले होते.

Khalistani terrorist Rinda sends RDX to Telangana

सहा महिन्यांपूर्वी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हा अलर्ट हरविंदर सिंह रिंदा याच्यासंदर्भातच होता. त्यामुळे नांदेडमध्ये सापडलेले आरडीएक्स हे मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दहशतवादी हरविंदरने नांदेडमधील लोकांकडून जवळपास २०० कोटींची वसुली केली आहे. या पैशांचा उपयोग तो दहशतवादी कारवायांसाठी करणार असल्याचे उघड होत आहे. सध्या हरविंदर पाकिस्तानातील इस्लामाबाद शहरात असून यापूर्वी तो लाहोरमध्ये होता.

 

हे ही वाचा:

अफगाणिस्तानमध्ये घराबाहेर पडताना बुरखा घालणे बंधनकारक

बीडच्या अविनाश साबळेने मोडला तीस वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम

ठाकरेंच्या आधी पवार पोहोचले अयोध्येला! राष्ट्रवादीलाही लागले हिंदुत्वाचे वेध?

‘ठाकरे सरकार राज ठाकरेंना घाबरले’

महाराष्ट्र पोलीस दहशतवाद्यांच्या पूर्वीच्या आरडीएक्सच्या खेपेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या कथित मानवी स्फोटामागे हरविंदरचा हात असल्याचं लुधियाना येथील न्यायालयाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, काल हरियाणातील कर्नाल चेक पोस्टवर चार अतिरेक्यांना अटक केली होती. यावेळी चौघांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठी जप्त करण्यात आला होता. नांदेड आणि आदीलाबादमध्ये मोठा घातपात करण्याचा कट असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा