30 C
Mumbai
Sunday, December 5, 2021
घरक्राईमनामाअखेर किरण गोसावीला अटक

अखेर किरण गोसावीला अटक

Related

भारतभर गाजणार्‍या आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील पंच असलेल्या किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. २०१८ च्या फसवणुकीच्या गुन्ह्या संदर्भात सध्या पुणे पोलिसांमार्फत गोसावीची चौकशी सुरू आहे. किरण गोसावीच्या अटकेमुळे आर्यन खान ड्रग्स प्रकरणात नवे कोणते वळण येणार हे बघणे महत्वाचे झाले आहे.

आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणातील एनसीबीचा स्वतंत्र पंच असणारा किरण गोसावी हा चांगलाच वादात अडकला होता. आर्यन खान सोबत त्याने घेतलेला सेल्फी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तर त्यानंतर किरण गोसावीचे २०१८ मधील फसवणुकीचे प्रकरण समोर आले होते. २०१८ साली किरण गोसावीला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. पण त्यानंतर गोसावीला फरार घोषित करण्यात आले होते. २०१९ साली पुणे पोलिसांनी त्याला वॉन्टेड देखील घोषित केले होते. तेव्हापासून बेपत्ता असलेला किरण गोसावी आता थेट आर्यन खान ड्रग्स प्रकरणात पुन्हा चर्चेत आला.

हे ही वाचा: 

नवाब मलिकांविरोधात महिला आयोगातही तक्रार

चीनच्या नव्या सीमा कायद्यावर भारत नाराज

नवाब मलिक, एनसीबीसंदर्भातील तक्रारींची चौकशी करणार हे चार अधिकारी

नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी निधीचा प्रवाह

तर आर्यन खान प्रकरणात गोसावीचा अंगरक्षक असलेल्या प्रभाकर साईलीने किरण गोसावीवर शाहरूख खानकडे खंडणी मागितल्याचे आरोप केल्यामुळे खळबळ उडाली. तर किरण गोसावीने हे सर्व आरोप फेटाळताना महाराष्ट्रात आपल्या जिवाला धोका असल्याचा आरोप केला होता.

दरम्यानच्या काळात किरण गोसावी हा अगरतळा आणि लखनऊ अशा दोन ठिकाणी असल्याची माहिती समोर आली होती. किरण गोसावीचे नाव आर्यन खान ड्रग्स प्रकरणात समोर येताच पुणे पोलिसांचे पथक पुन्हा सक्रिय होऊन त्याचा शोध घेऊ लागले होते. त्यात अखेर त्यांना यश आले असून किरण गोसावीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. तर आज सकाळी ११ वाजता पुणे पोलिस या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,511अनुयायीअनुकरण करा
4,870सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा