32 C
Mumbai
Sunday, April 26, 2026
घरक्राईमनामाआग्रीपाड्यात लव्ह जिहाद! हिंदू तरुणींना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या अश्रफला बेड्या

आग्रीपाड्यात लव्ह जिहाद! हिंदू तरुणींना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या अश्रफला बेड्या

आग्रीपाडा पोलिसांची कारवाई

Google News Follow

Related

कॉर्पोरेट कंपनीत काम करणाऱ्या हिंदू तरुणींना टार्गेट करून त्यांना अश्लील व्हिडिओ आणि मेसेज पाठवून त्रास देणाऱ्या एका नराधमाला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अश्रफ सिद्दीकी असे या आरोपीचे नाव असून, तो तरुणींवर शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत ही कारवाई केली.

लोअर परळ येथील पीरामल टॉवरमधील एका नामांकित कंपनीत पीडित तरुणी थर्ड पार्टी टेलिकॉलर म्हणून काम करते. आरोपी अश्रफ हा देखील त्याच कंपनीत कामाला होता. काही दिवसांपूर्वी अश्रफची नोकरी सुटली, त्यानंतर त्याने कंपनीतील पीडित तरुणीसह इतर ३-४ हिंदू मुलींचे मोबाइल क्रमांक मिळवले. या तरुणींना तो सातत्याने अश्लील फोटो, व्हिडिओ आणि मेसेज पाठवून मानसिक त्रास देत होता.

पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, अश्रफने तिला अनेकदा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी गळ घातली. जेव्हा पीडितेने आपण हिंदू असल्याचे सांगून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने “आजकल हिंदू मुलींना मुस्लिम मुलगेच आवडतात,” असे आक्षेपार्ह विधान करत तिला चिथावणी दिली. तसेच सोबत काम करणाऱ्या इतर मुलींबद्दलही त्याने अत्यंत खालच्या भाषेत टिप्पणी केली होती.

हे ही वाचा:

१५२ पैकी ११० जागांवर भाजपच… पहिल्या टप्प्यानंतर अमित शाह यांचा दावा

इराण दूतावासाचा ‘जय महाराष्ट्र!’ ट्रम्पना लगावली चपराक

बारामती–राहुरी पोटनिवडणूक; ५५% पेक्षा अधिक मतदान

“ही काय फलंदाजी?” पंतवर बांगरचे ताशेरे

पीडितेच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “नोकरी सुटल्यानंतर या मुलाने माझ्या मुलीसह इतर हिंदू मुलींचे नंबर शोधून काढले आणि त्यांना त्रास देऊ लागला. मुलीने तीन दिवसांनंतर धाडस करून मला हा प्रकार सांगितला, त्यानंतर आम्ही तात्काळ पोलीस ठाणे गाठले.”

या घटनेनंतर भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या आरोपीने २०२४ पासून आतापर्यंत अनेक हिंदू तरुणींना अशाच प्रकारे आपल्या जाळ्यात ओढले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी ‘एसआयटी’ स्थापन करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी नेत्यांनी केली आहे.

आग्रीपाडा पोलिसांनी आरोपी अश्रफ सिद्दीकीला अटक केली असून उद्या त्याला वैद्यकीय चाचणीनंतर न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस त्याची कोठडी मागणार असून, त्याने आतापर्यंत आणखी किती मुलींचा छळ केला आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा