अलीकडच्या काही महिन्यांमध्ये, भोपाळ आणि मध्यप्रदेशातील इतर छोट्या शहरांमध्ये हिंदू महिलांना लक्ष्य करणारी एक संगठित लैंगिक शोषणाची टोळी उघडकीस आली आहे. या टोळीचा ‘लव्ह जिहाद’चा पद्धतशीर प्रकार म्हणजे आधी मैत्री करणे, नंतर शारीरिक संबंध ठेवून अश्लील व्हिडिओ बनवणे आणि शेवटी धर्मांतरासाठी धमकावणे.
हे कृत्य सदर मुस्लिम मुले पुण्य कमावण्यासाठी (सवाब) करत असल्याचे एका आरोपीने सांगितले. यात अटक केलेला आरोपी फरहानने चौकशीदरम्यान कोणताही पश्चात्ताप व्यक्त केला नाही आणि उलट तो म्हणाला की त्याला “सवाब” (धार्मिक पुण्य) मिळते.
भाजप आमदारांचा संताप
या घटनेनंतर भोपाळचे भाजप आमदार रमेश्वर शर्मा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली: “जे सवाबाची भाषा करतात, त्यांना कब्रस्तानाची तयारी करावी लागेल. आम्ही मध्यप्रदेशात लव्ह जिहाद फोफावू देणार नाही,” असे ते म्हणाले.
पोलिसांनी विविध शहरांमधून १२ पेक्षा जास्त आरोपींना अटक केली आहे.
हे ही वाचा:
अंधारे रातो मे सुनसान राहो पर !
एलॉन मस्क यांचे ट्रम्प सरकारला टाटा बाय बाय!
बहुचर्चित अंकिता हत्याकांडाचा निकाल आज
१७ वर्षांची तहान… शेवटी RCB फाइनलमध्ये!
संगठित टोळीचा भांडाफोड
एका विद्यार्थिनीने ‘फरहान’ नावाच्या आरोपीविरुद्ध तक्रार केल्यानंतर, पोलिसांनी एका संगठित टोळीचा पर्दाफाश केला. फरहानच्या मोबाइलमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ सापडले, ज्यात तो महिलांवर बलात्कार करताना दिसतो.
सध्या पाच पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार दिली आहे. फरहानसह साहिल, अली, साद आणि नबील या चौघांना अटक करण्यात आली आहे.
टोळीची कार्यपद्धती
पोलिसांच्या माहितीनुसार, ही टोळी भोपाळमध्ये शिक्षण घेत असलेल्या लहान गावांमधील हिंदू विद्यार्थिनींना लक्ष्य करत होती. फरहान मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, नंतर बलात्कार करून त्याचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत असे. साहिल, जो अशोक गार्डनमध्ये डान्स क्लास चालवत होता, त्यानेही अशाच प्रकारे हिंदू मुलींना लक्ष्य केले. अलीने देखील एक विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचे व्हिडिओ फरहानकडे पाठवले. साद, जो मेकॅनिक आहे, पीडित महिलांना फरहानच्या घरी घेऊन जात असे आणि गांजाची तस्करी करायचा. नबील आणि अबरार यांनी टोळीला जागा दिली जिथे महिलांवर अत्याचार होत होते.
टोळीचा एक सदस्य हामिद याने गेल्या वर्षी आत्महत्या केली. टोळी हुक्का लाऊंज आणि पबमध्ये महिलांना घेऊन जात असे, जिथे त्यांना ड्रग्ज देऊन अत्याचार केले जात.
महिला पोलीस अधिकारीही ठरली बळी
रायसेन जिल्ह्यातील मंडीदिपमध्ये कार्यरत असलेल्या एका महिला उपनिरीक्षकाला ‘इस्तियाक अहमद’ याने ‘अमन’ नाव घेऊन लग्न केले. दोन वर्षांनी ती अधिकारी त्याच्या कागदपत्रांतून खरी ओळख शोधू शकली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.
२०२१ मध्ये, तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने ‘धार्मिक स्वातंत्र्य कायदा’ लागू केला, ज्यात दोषी आढळल्यास १० वर्षांपर्यंतची शिक्षा आणि १ लाख रुपये दंड होऊ शकतो.
एक घटस्फोटित महिलेची कहाणी
एक पीडित महिला, वय ३५, जी आपल्या १४ वर्षांच्या मुलासह राहते, तिने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत नमूद केले की, ‘नदीम’ नावाच्या व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. नंतर त्याने तिला आणि तिच्या मुलाला इस्लाम स्वीकारण्याचा दबाव टाकला. या नदीमने अमित असे नाव धारण करून या महिलेला फसवले होते.
महिलेने सांगितले की, नदीम आधी तिच्या घरात ये-जा करत होता, मदत करत होता. नंतर त्यांच्या शारीरिक संबंध सुरू झाले, पण तिला नंतर समजले की तो आधीच विवाहित आहे.
१३ मे २०२५ रोजी नदीमने तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचे व्हिडिओ बनवले. त्यानंतर त्याने तिला बुरखा घालण्यास, गुरुवारी उपवास बंद करण्यास, आणि त्याची परवानगी घेतल्याशिवाय घराबाहेर न पडण्यास सांगितले. त्याच्या दडपणामुळे ती पोलिसांकडे गेली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून नदीमविरोधात मध्यप्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
