26 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरक्राईमनामामुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क

Google News Follow

Related

‘इरफान अहमद शेख’ अशा नावाने फोन करून एका इसमाने मुंबई विमानतळाला उडवण्याची धमकी दिली असून आपण इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचा दावा सुद्धा केला आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवण्याची धमकी दिल्यावर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा आता अलर्ट झाल्या आहेत. त्यामुळे विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळ सोमवारी रात्री उशिरा दहा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने मुंबई विमानतळावर फोन कॉल करून मुंबई विमानतळ अर्थात  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ   बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. फोनवर धमकी दिल्यानंतर तो कोडे शब्द वापरून काही संशयास्पद  गोष्टींबद्दल सांगत होता.

हे ही वाचा:

कॉपीमुक्त परीक्षांसाठी राज्य परीक्षा मंडळाचा कठोर निर्णय

तूर्की,सीरिया भूकंपातील मृतांचा आकडा ४,००० पेक्षा अधिक

भूकंपग्रस्त तूर्कीला मदत करण्यासाठी भारत धावला

वांगी शेतीची यशोगाथा, कल भी, आज भी….

 

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल 

आलेल्या फोन कॉल नंतर विमानतळ कर्मचाऱ्यांनी तात्काळ मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळावरील सुरक्षा वाढवली आहे. या धमकीची तक्रार मुंबईतील सहार पोलीस स्थानकांत अज्ञाताविरुद्ध कलाम ५०५(१) या अन्वये तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. येत्या दहा फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीसानी हि धमकी गांभीर्याने घेतली असून मुंबई पोलीस , तपास यंत्रणा सतर्क होऊन विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा