29 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरदेश दुनियामुंबईकरांसाठी खुशखबर पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुरु

मुंबईकरांसाठी खुशखबर पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुरु

मुंबईकरांच्या पैशात आणि वेळेत होणार बचत ,

Google News Follow

Related

मुंबईच्या धकाधकीच्या जीवनांत प्रवास हा भाग अनिवार्य झाला आहे. तुम्ही रोज ऑफिसला जाण्यासाठी कसा प्रवास करता हे खूप महत्वाचे आहे. अत्यंत धावपळीमध्ये जर का आपला प्रवास सुखकर असेल तर प्रवासाचा ताण आपल्यावर येत नाही म्हणूनच मुंबईकरांच्या सेवेत आजपासून बेलापूर ते फोर्ट पर्यंत  पहिली  वॉटर टॅक्सी दाखल झाली आहे. सहसा खासगी टॉक्सिने आपण प्रवास केला तर ६०० ते ८०० रुपये आपल्याला मोजावे लागतात. याशिवाय रहदारीसाठी जवळजवळ दोन तास सहज लागतात. शिवाय आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे अजूनही हार्बर मार्गावर वातानुकूलित गाड्यांची सोय नाही.

आता आपण बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॉक्सिन प्रवास करू शकतो. यामध्ये एका वेळेस २०० प्रवासी प्रवास करू शकतात तसेच आपण ६० मिनिटांमध्ये मुंबई ते नवी मुंबई प्रवास करू शकतात. रोज सकाळी साडे आठ वाजता बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया आणि सायंकाळी साडेसहा वाजता गेट वे ऑफ इंडिया ते नवी मुंबई अशा दोन फेऱ्या सध्या या जलमार्गावर उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे.  या जलमार्गावरील हि २०० प्रवासी क्षमतेची ही हायस्पीड बोट असून गर्दीच्या वेळेस आपण फक्त ६० मिनटात अंतर पार करू शकता. यासाठी प्रत्येकी आपल्याला ३०० रुपये द्यावे लागणार आहेत.

हे ही वाचा:

अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप

श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात

पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद

आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला

या अत्याधुनिक वॉटर टॅक्सिचा पर्याय सागरी मंडळ आणि बंदर प्राधिकरण यांनी समोर आणला आहे. याआधी भाऊंचा धक्का ते बेलापूर, बेलापूर ते जेएनपीटी आणि बेलापूर ते एलिफन्टा अशी सेवा फेब्रुवारीमध्ये सुरु करण्यात आली आहे पण, त्याला हवा तसा प्रतिसाद लाभत नाही आहे. आता बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया हि सेवा सुरु केल्यामुळे नोकरदारांना दिलासा मिळाला आहे. आता या सेवेला कसा प्रतिसाद मिळेल त्याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल. हि वॉटर टॅक्सी सोमवार ते शुक्रवार अशी पाच दिवस सेवा देणार आहे. नोकरदारांना या साठी पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नोकरदार व्यक्तींना मासिक पास खरेदी केल्यास नियमित भाड्यात २० टक्के सूट दिली जाणार असल्याची माहिती उपलब्ध आहे.

या पहिल्या वॉटर टॅक्सिचा फायदा दक्षिण मुंबईत काम करणाऱ्या नोकरदारांना दिलासा मिळणार असून हि वॉटर टॅक्सी सेवा संपूर्ण अत्याधुनिक आणि वातानुकूलित बनवली आहे. आता बेलापूर ते गेट वे ऑफ इंडियाला प्रवास करणाऱ्या लोकांना दिलासा मिळणार आहे. आज बंदर विकास मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या वॉटर टॅक्सिचा शुभारंभ करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणांत कार्यालये आहेत. ह्या वॉटर टॅक्सिमुळे दक्षिण मुंबई आणि बेलापूर मार्ग जोडला जाणार आहे. आपण जर का खाजगी वाहन किंवा टॉक्सिने प्रवास केल्यास ६०० ते ८०० रुपये मोजावे लागतात. शिवाय रहदारीच्या वेळेस सुमारे दोन तास वेळ लागतो शिवाय आणखी एक म्हणजे हार्बर मार्गावर अजूनही रेल्वेची वातानुकूलित सेवा उपलब्ध नसल्यमुळे आणि यामुळेच वेळ आणि पैशांची बचत होणार असल्याचे कळते.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा