26 C
Mumbai
Thursday, March 30, 2023
घरक्राईमनामाकॉपीमुक्त परीक्षांसाठी राज्य परीक्षा मंडळाचा कठोर निर्णय

कॉपीमुक्त परीक्षांसाठी राज्य परीक्षा मंडळाचा कठोर निर्णय

विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी नवा निर्णय

Google News Follow

Related

तुमचा पाल्य यावर्षी दहावी किंवा बारावीची बोर्ड परीक्षा देत आहे का तर जरा इकडे लक्ष द्या . राज्य मंडळाने आता होणाऱ्या दहावी बारावीच्या होणाऱ्या परीक्षांसाठी आता नवा नियम केला आहे. आता दहावी आणि बारावीची प्रश्नपत्रिका मोबाईल च्या माध्यमातून समाज माध्यमात पस्रवल्यास त्या विद्यार्थ्यांला पाच वर्षे निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता थोड्याच दिवसात दहावी आणि बारावीची परीक्षा सुरु होणार आहे, या पार्श्वभूमीवर बोर्डाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

राज्य मंडळाने अर्थात बोर्डाने कितीही नियम लावले तरीही कॉपिचा सुळसुळाट कमी च होत नाही. प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यातच सध्याच्या काळांत मोबाइल च्या माध्यमातून प्रश्नपत्रिका अनेक समाजमाध्यमांवर पसरलेल्या आधल्या आहेत. म्हणूनच राज्य परीक्षा मंडळाने हे कठोर पाऊल उचलण्याचे ठरवले असून यासाठी एक समिती सुद्धा स्थापन करून हा निर्णय घेतला आहे. इंजिनीअरिंग , फार्मासिच्या प्रश्नपत्रिका मागील काही परीक्षेच्या पूर्वीच समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणांत पसरल्यावर या गंभीर बाबी रोखण्यासाठी राज्य परीक्षा मंडळाला हा कठोर निर्णय घ्यावा लागला. कारण स्थानिक पातळीवर पपेरफुटीच्या गंभीर घटना जास्त घडत आहेत. यात मोबाईलच्या माध्यमातून त्वरित प्रश्नपत्रिका मुलांपार्यंत पोचल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला.

राज्यात ज्या ठिकाणी दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रे आहेत त्यांना सर्वांना सूची पाठविण्यात आली आहे. आणि म्हणूनच या सर्व केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हा संदेश पोचवण्यात आल्याचे परीक्षा मंडळाकड़ून सांगण्यात आले. दहावी बारावीच्या परीक्षा आता अगदी थोड्या दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत , याच पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा मंडळाने हा आदेश जरी केला आहे. यामध्ये मोबाईल वर प्रश्नपत्रक समाजमाध्यमांवर पसरवल्यास पाच वर्षे परीक्षेपासून निलंबित आणि याशिवाय फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप

श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात

पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद

आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला

जर का कॉपी प्रकरणात इतर कोणाचा सहभाग असल्यास त्या व्यक्तीवर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या आधी कॉपी प्रकरणात कोणीही आढळून आल्यास त्या व्यक्तीला तीन वर्षे निलंबित केले जात होते. राज्य मंडळाकडून पपेरफुटीला आळा बसण्यासाठी संपूर्ण बारा पानांची शिक्षा सूचित जारी करण्यात आली असून तिचे पालन करण्याचे आदेश सर्व शाळांना,  महाविद्यालये आणि परीक्षा केंद्रांना देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळातील परीक्षा तरी कॉपीराहित होतात का या कडेच सर्वांचे लक्ष लागले आहेत.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,877चाहतेआवड दर्शवा
2,034अनुयायीअनुकरण करा
65,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा