29.2 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरराजकारणजेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा

जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा

अंतर्गत कलह मुख्य कारण

Google News Follow

Related

महाराष्ट्र्र काँग्रेसचा अंतर्गत कलह आता वेगळ्या वळणावर येऊन राहिला आहे. काँग्रेस चे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांचा विधीमंडळ पक्ष नेते पदाचा राजीनामा दिल्याचे दिल्लीतील सू त्रांकडून कळत आहे. यामुळे महाराष्ट्र काँग्रेस मधील गटबाजी याचे प्रमुख कारण असल्याचे बोलले जाते.  काँग्रेसचा अंतर्गत कलह आता खूप मोठ्या वळणावर येऊन ठेपला आहे. आता विधानपरिषदेच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाचा अंतर्गत कलह चव्हाटयावर येऊन ठेपला आहे.

जेष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून विधिमंडळ पक्षनेतेपदाचा आपला राजीनामा सादर करण्यात आल्याची माहिती दिल्ली तील काँग्रेस सूत्रांनी सांगितले आहे. नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी नाराजी व्यक्त करत असतानाच त्यांनी राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत होती. काँग्रेस अध्यक्ष नाना पाटोळे यांच्याबरोबर काम करण्यास त्यांनी असमर्थतता दर्शवली आहे. आता दिल्ली हायकमांड याबाबतीत काय निर्णय घेणार बाळासाहेब थोरातांचे मन वळवणार का पक्षात आपल्यला नवे बदल दिसणार हे आता बघण महत्वाचे ठरेल.

हे ही वाचा:

कुठला शिवसंवाद हा तर स्वसंवाद!

भूकंपग्रस्त तूर्कीला मदत करण्यासाठी भारत धावला

वंदे भारतने कसारा घाटात इंजिनाला दाखवला कात्रजचा घाट

स्वतःचे नाव बदलून हिंदू मुलीचे केले धर्मांतर

केंद्रीय नेतृत्व बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात सतत असून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयन्त करत असल्याची माहिती समोर आली आहे. पण बाळासाहेब थोरात आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे अधिकृत सूत्रांकडून कळले आहे. तसेच बाळासाहेब थोरात यांनी यापुढेही आपण काँग्रेस चिच विचारधारा पुढे नेणार असल्याचे थोरातानी या वेळेस स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र काँग्रेस पक्षातील कलह नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या काळात टोकाला गेल्याचे सर्वांसमोर आले होते.

त्यानंतर काही दिवसांपूर्वी थोरातांचे भाचे असलेले सत्यजित तांबे यांच्या पत्रकार परिषदेतून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत नाराजी त्यांनी अगदी उघडपणे जाहीर केली होती. त्यातच आता बाळसाहेब थोरात यांच्या राजीनाम्या संदर्भातील वृत्तानंतर पक्षातील संपूर्ण कलह आणि नाराजी अगदी टोकाला गेल्याचे चित्र आता अगदी स्पष्ट झाले आहे.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा