28 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरक्राईमनामास्वतःचे नाव बदलून हिंदू मुलीचे केले धर्मांतर

स्वतःचे नाव बदलून हिंदू मुलीचे केले धर्मांतर

रायबरेली पोलिसांनी केले आरोपीला अटक

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील रायबरेली मध्ये ‘लव्ह जिहादचे’ प्रकरण समोर आल्यानंतर पोलीस पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. पाच फेब्रुवारीला रायबरेलीच्या सलोन या भागात एका हिंदू मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून धर्मांतरित केल्याची घटना आता समोर येत आहे.

पोलिसांनी याच फसवणूक झालेल्या महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सलोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एका विवाहित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

हे ही वाचा:

अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप

श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात

पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद

आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला

घरोघरी दूध विक्री करणाऱ्या तरुणाने आपले नाव मुन्ना यादव घोसीयाना येथील रहिवासी असल्याचे सांगून तिच्याशी जवळीक वाढवली त्यानंतर त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला लग्नाचा प्रस्ताव ठेवला या मुन्ना यादवने तिला घरी नेले असता त्याचे खरे नाव मुन्ना यादव नसून ‘अब्दुल खालिद’ असल्याचे समोर आले. या महिलेला सत्य परिस्थिती कळताच तिने त्यांच्यबरोबरीचे संबंध तोडून टाकले. पण त्यानंतरही त्याने शस्त्रांचा वापर करून तिला जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पडले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार करून कोणाकडे वाच्यता केल्यास तिला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन तो पळून गेला.

हिंदू संघटनेने चार फेब्रुवारी च्या रात्री या महिलेसह पोलीस स्थानक गाठून मुन्ना यादव उर्फ अब्दुल खालिद याची तक्रार दाखल केली. एसपींच्या सूचनेनंतर पोलिसांनी महिलेचा जबाब घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. मंडळ अधिकारी , अमित सिंग यांनी सांगितले कि, आरोपीला त्याच्याच घरातून अटक करून कोर्टात सादर करून त्याची तुरुंगात रवानगी केली आहे.    

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,877चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा