30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरक्राईमनामाअर्शदीप सिंगचा संबंध खालिस्तानशी जोडल्यामुळे विकिपीडियाला नोटीस

अर्शदीप सिंगचा संबंध खालिस्तानशी जोडल्यामुळे विकिपीडियाला नोटीस

विकीपीडियावरील अर्शदीप सिंगच्या पेजवर काही बदल करण्यात आले. अर्शदीप आणि खलिस्तान संघटनेचे संबंध असल्याचे त्यात म्हटले गेले होते.

Google News Follow

Related

दुबईमध्ये सध्या ‘आशिया कप २०२२’चा थरार सुरू आहे. दरम्यान, रविवारी सुपर- ४ स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तान यांची लढत झाली. या लढतीत पाकिस्तानने भारतावर ५ विकेट्सनी विजय मिळवला. मात्र, यानंतर चर्चेत आला तो भारताचा युवा जलद गोलंदाज अर्शदीप सिंग. अर्शदीपकडून मोक्याच्या क्षणी एक कॅच सुटला आणि भारताने सामना गमावला, अशी समज सर्वांकडून झाली.

अर्शदीप सिंगच्या या चुकीनंतर त्याच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. तर माजी खेळाडू आणि अनेकांनी त्याची पाठराखण देखील केली. दरम्यान, धक्कादायक म्हणजे विकीपीडियावरील अर्शदीप सिंगच्या पेजवर काही बदल करण्यात आले. अर्शदीप आणि खलिस्तान संघटनेचे संबंध असल्याचे त्यात म्हटले गेले होते. विकिपीडियावर भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचे नाव खलिस्तानशी जोडल्याप्रकरणी भारत सरकारने कठोर पावले उचलली आहेत.

या प्रकरणी आता भारत सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क मंत्रालयाकडून विकीपीडियाला नोटीस पाठवण्यात आली आहे. या अशा वक्तव्यांमुळे भारतातील वातावरण बिघडू शकते. तसेच यामुळे अर्शदीप सिंगच्या कुटुंबाला देखील धोका निर्माण होऊ शकतो.

पाकिस्तानच्या विजयानंतर, अर्शदीपला विकिपीडियाच्या प्रोफाइलमध्ये २०१८ च्या अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये खलिस्तानी संघाचा भाग असल्याचे दाखविले होते. अर्शदीप हा भारताच्या अंडर-१९ वर्ल्ड चॅम्पियन संघाचा भाग होता.

हे ही वाचा:

राजपथ आता कर्तव्यपथ

१४ हजार ५०० शाळांसाठी ‘पीएम श्री स्कुल्स’ स्मार्ट योजनेची घोषणा

दोन दशकानंतर पाकिस्तानने दहशतवाद्याचा मृतदेह स्वीकारला

लिज ट्रस लवकरच घेणार ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ

रविवारी झालेल्या सामन्यात अर्शदीप सिंगने १८ व्या षटकात आसिफ अलीचा कॅच सोडला. यानंतर आसिफने ८ चेंडूत १६ धावा करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

मोहम्मद झुबेर विरोधात तक्रार दाखल 

भारतीय जनता पक्षाचे नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी अल्ट न्यूज वेबसाइटचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. क्रिकेटपटू अर्शदीप सिंग आणि शीख समुदायाविरोधात द्वेष पसरवल्याचा आरोप सिरसा यांनी झुबेरवर केला आहे. अर्शदीप सिंगला लक्ष्य केले जात असून त्याला वेळोवेळी खलिस्तानी संबोधले जात आहे. हे सर्व आयएसआय आणि पाकिस्तानच्या षड्यंत्राखाली चालवले जात आहे. अनेक व्हेरिफाईड अकाऊंटवरून ट्विट करण्यात आले आहे आणि यात मोहम्मद जुबेर यांचा सहभाग असू शकतो अशी शक्यता सिरसा यांनी व्यक्त केली आहे. मोहम्मद झुबेर याच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा