30 C
Mumbai
Tuesday, May 17, 2022
घरक्राईमनामाशेतात आले दागिन्यांचे पीक!

शेतात आले दागिन्यांचे पीक!

Related

मुंबईतील एका व्यवसायिकाच्या कार्यालयातून सुमारे साडे आठ कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी करून पळून गेलेल्या एका नोकरासह त्याला साथ देणाऱ्या १० जणांना पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली आहे.

चोरीचा माल पोलिसांना मिळू नये म्हणून चोरलेले दागिने एकाचा शेतात पुरून ठेवल्याचे समोर आले आहे. शेतात पुरलेले दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले घेतले आहे, दरम्यान आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

दक्षिण मुंबईतील ताडदेव येथे राहणारे सोन्याचे व्यवसायिक खुशाल टामका यांचा सोन्याचे दागिने बनवून देण्याचा व्यवसाय आहे.गोरेगाव या ठिकाणी टामका यांचा कारखाना असून दक्षिण मुंबईतील भुलेश्वर याठिकाणी त्याचे कार्यालय आहे. टामका यांच्याकडे ८ नोकर मागील १० वर्षांपासून काम असून त्यापैकी गणेश हिरामण कुमार (२१) याला ६ महिन्यापूर्वीच कामावर ठेवण्यात आले होते.

गणेश हा दागिन्यांची डिझाईन दाखवून इतर व्यापाऱ्याकडून ऑर्डर घेण्याचे काम करीत होता. काही महिन्यात गणेशने मालकाचा विश्वास संपादन केल्यावर मालकाने त्याच्यावर कार्यालयाची जवाबदारी सोपवली होती. गणेश हा दिवसभर कार्यालयात काम करून शेजारीच सोसलेल्या खोलीत राहत होता. डिसेंबर महिन्यात वांद्रे कुर्ला संकुल या ठिकाणी दागिन्यांचे प्रदर्शन असल्यामुळे टामका यांनी गोरेगाव येथील कारखान्यात तयार केलेले वेगवेगळ्या डिझाईनचे सोन्याचे दागिने आणून कार्यलयातील तिजोरीत ठेवले होते.

८ कोटी ११ लाख रुपयांचे दागिने आणि ८ लाख ५७ हजार रुपयाची रोकड असा एकूण ८ कोटी  १९ लाख ६७ हजार रुपयाचा ऐवज तिजोरीत ठेवण्यात आला होता. कोवीडमुळे प्रदर्शन रद्द झाल्यामुळे  व्यवसायिक टामका यांनी हे दागिने पुन्हा कारख्यानावर न पाठवता दक्षिण मुंबईतील व्यापार्याना देण्यासाठी तिजोरीत ठेवले होते. या तिजोरीची एक चावी नोकर गणेश आणि व्यवसायिक टामका यांच्याकडे होती. १३ जानेवारी रोजी रात्री व्यवसायिक यांनी कार्यालय बंद करून गणेशला लक्ष ठेवण्यास सांगितले होते.

गणेश कुमार या नोकराने दोन मित्राच्या मदतीने तिजोरीमध्ये ठेवण्यात आलेले दागिने आणि रोकड असा एकूण ८ कोटी ११ लाख रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी ८ विविध पथके तयार कऱण्यात आले होते. या पोलीस पथकाने राजस्थान आणि मध्यप्रदेश येथून मुख्य आरोपी गणेश कुमार देवाशी आणि त्याचे इतर दोघे साथीदार किसन प्रल्हाद चौहान आणि रमेश प्रजापती या तिघांना अटक करण्यात आली होती. या तिघांच्या चौकशीत धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे.

या तिघांनी पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच पोलिसांनी आपल्याला अटक केली तरी चोरीचा ऐवज पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून या तिघांनी राजस्थानमध्ये आणखी ९ जणांना सामील करून घेतले आणि प्रत्येकाकडे थोडे थोडे चोरलेले दागिने ठेवण्यासाठी दिले होते. त्यापैकी ४ कोटी १५ लाख रुपये किमतीचे दागिने व रक्कम रमेश प्रजापती याच्या राजस्थान मध्ये असलेल्या शेतात पुरून ठेवले होते.

हे ही वाचा:

भैय्यू महाराजांच्या आत्महत्याप्रकरणी त्यांचे ‘हे’ तीन निकटवर्तीय दोषी

महेश मांजरेकर यांच्याविरोधात दोन फौजदारी तक्रारी

स्वातंत्र्य लढ्यातील महिला सेनानींची ‘अमर चित्रकथा’

सर्वोच्च न्यायालयाचा ‘मविआ’ला तडाखा

लो.टी.मार्ग पोलिसांच्या तपास पथकाने राजस्थान मधून इतर ७ आरोपीना देखील करून त्यांच्याजवळील दागिने तसेच शेतात पुरलेले दागिने असा एकूण ७ कोटी १२ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. एकूण दहा आरोपीना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्याप फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,978चाहतेआवड दर्शवा
1,882अनुयायीअनुकरण करा
9,320सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा