27 C
Mumbai
Wednesday, September 28, 2022
घरक्राईमनामाअडीच हजार कोटींच्या ड्रग्स प्रकरणात अंबरनाथचा कारखानदार जेरबंद

अडीच हजार कोटींच्या ड्रग्स प्रकरणात अंबरनाथचा कारखानदार जेरबंद

याप्रकरणातील ही आठवी अटक

Related

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अडीच हजार कोटींच्या ड्रग्स प्रकरणी अंबरनाथ येथील कारखाना मालकाला अटक केली आहे. याप्रकरणातील ही आठवी अटक असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाने दिली आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाने मार्च महिन्यात मुंबईतील गोवंडी , ठाण्यातील अंबरनाथ आणि पालघर जिल्ह्यात कारवाई करून मोठ्या प्रमाणात एमडी (मेफेड्रोन ) या अमली पदार्थाचा साठा जप्त करून एमडी तयार करण्यात येणारे कारखाने उध्वस्त केले होते. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती.

दरम्यान ऑगस्ट महिन्यात अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटने या प्रकरणात गुजरात राज्यात एका कारखान्यावर छापेमारी करून दोघांना अटक करून मोठ्या प्रमाणात एमडी हा ड्रग्स जप्त करण्यात आला होता. मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने या दोन्ही कारवाईत जप्त करण्यात आलेला एमडी हा ड्रग्सची किमंत सुमारे अडीज हजार कोटी असल्याचे समोर आले होते.

हे ही वाचा:

के. सुरेश कोस्टगार्डचे १४ वे तटरक्षक दल प्रमुख

भेसळयुक्त दूध विकणाऱ्या सहा जणांना अटक

पुन्हा एकदा ‘महाभारत’

कॅनडातील स्वामी नारायण मंदिरावर खलिस्तानी हल्ला

 

या प्रकरणात अंबरनाथ येथील एमडी तयार करण्यात येणाऱ्या कारखान्याचा मालक जिनेंद्र वोरा हा फरार होता, त्याला बुधवारी अटक करण्यात आली आहे. नमाऊ केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मालक असलेले जिनेंद्र वोरा (५४) याचे नाव अटकेत असलेल्या प्रेम प्रकाश सिंग चौकशीत नाव समोर आले होते, तेव्हा पासून जिनेंद्र वोरा याचा कसून शोध घेण्यात येत होता. अखेर बुधवारी त्याला अटक करण्यात आली आहे. वोरा याच्या कारखान्याचा व्यवस्थापक किरण पवार याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

अटकेत असलेला प्रेम सिंग हा सेंद्रिय रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधर, सिंग यानी कथितपणे मेफेड्रोनच्या उत्पादनासाठी आपले ज्ञान वापरले आणि ते मुंबई आणि जवळपासच्या शहरांमध्ये एमडीचा सर्वात मोठा पुरवठादार असल्याचे सांगितले जाते. त्याच्या बँक खात्यांच्या तपासणीत सुमारे ५० कोटींच्या ठेवी आणि अनेक गैरव्यवहार उघड झाले आहेत. त्याच्याकडे दहिसरमध्ये थ्री-बीएचके फ्लॅट, नालासोपारा येथे दोन दुकाने आणि मुंबईबाहेर तीन भूखंड आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,967चाहतेआवड दर्शवा
1,941अनुयायीअनुकरण करा
40,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा