महाकुंभ मेळाव्यासाठी ‘हेलिकॉप्टर’ राईड देण्याच्या नावाखाली मुंबईतील भाविकांची आर्थिक फसवणूक करणारी बिहारी टोळी मुंबई पोलिसांनी उध्वस्त केली आहे. या टोळीतील पाच जणांना कफ परेड पोलिसांनी अटक करण्यात असून त्यात एका तरुणीचा समावेश आहे.
मुकेशकुमार ब्रिजेशकुमार (२८),सौरभकुमार रमेशकुमार (२५),अविनाशकुमार कमलेशकुमार उर्फ बिट्टू (२१),सृष्टी प्रदीपकुमार बर्नावल (२१),संजीतकुमार मिस्त्री(२४) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यापैकी चौघे बिहार राज्यातील नालंदा येथे राहणारे असून सृष्टी ही मुंबईतील अंधेरी येथे राहणारी आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. तक्रारदार श्रीमती कोठेकर यांना कुटूंबियासह उत्तरप्रदेश येथे सुरू असणाऱ्या महाकुंभ मेळावा येथे जावुन हेलिकॉप्टरने महाकुंभ मेळाव्याची राईडचा आनंद घ्यायचा होता.
श्रीमती कोठेकर यांनी गुगलवर हेलिकॉप्टर राईड महाकुंभ मेळावा असे सर्च केले असता त्यांना ‘महाकुंभ चॉपर सर्व्हिस ऑनलाईन’हे युआरएल आढळून आले. कोठेकर यांनी त्याच्यावर क्लिक केले असता एक वेबसाईट उघडली,त्या वेबसाईटवर असलेल्या एका मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला आणि त्यांनी २८ जणांसाठी हेलिकॉप्टर राईडची बुकिंग केली.
हे ही वाचा:
रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री
राहुलबाबा तुम्हाला छत्रपतींचे नाव पेलवणार नाही?
पाच राज्यांना १५५४.९९ कोटींचा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी मंजूर
काँग्रेसच्या मोफत धोरणाचा फटका हिमाचल प्रदेशाला
दरम्यान समोरच्या व्यक्तीने त्यांना पैसे पाठविण्यासाठी क्यू आर कोड पाठवला, या क्यू आर कोडवर कोठेकर यांनी ६० हजार रुपये पाठवले,मात्र हे पैसे पवनहंस या सरकारी खात्यावर न जाता सीमादेवीच्या खात्यावर पैसे गेल्यामुळे कोठेकर यांना संशय आला,आणि त्यांनी पुन्हा त्याच मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता समोरच्या व्यक्तीने उडवाउडवीची उत्तरे देऊन फोन कट केला. फसवणूक झाल्याचे कळताच कोठेकर यांनी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
कफ परेड पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला असता, ज्या खात्यावर ट्राजेक्शन झाले त्या खात्यातुन बिहार मधील शरीफ शहरातील एका एटीएम सेंटर मधून पैसे काढण्यात आल्याची माहिती कफ परेड पोलिसांना मिळताच पोलिसांनी बिहार पोलिसांच्या मदतीने तसेच एटीएम सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने आरोपीचा शोध घेवुन चार जणांना बिहारच्या नालंदा येथून अटक करण्यात आली तर सृष्टीला अंधेरी येथुन अटक करण्यात आली. सृष्टी ही एका मोबाईल कंपनीत कामाला असून तीने मोबाईल सिम आरोपीना दिले होते अशी माहिती कफ परेड पोलिसांनी दिली.