28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
घरक्राईमनामादसऱ्याआधी पुण्यात पोलिसांनी 'रावण'ला पकडले

दसऱ्याआधी पुण्यात पोलिसांनी ‘रावण’ला पकडले

Related

पुण्यातील रावण गॅंग ही गेल्या कित्येक वर्षांपासून पुण्यात धुमाकुळ घालत आहे. या गॅंगमधील चौघांना नुकतेच पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोक्का कारवाईसाठी पोलिसांना पाहिजे असलेल्या पुण्यातील रावण गॅंगच्या चौघांसह आणखी एकास घारेवाडी कऱ्हाड येथून तालुका पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मदतीने धाडसी छापा टाकुन ताब्यात घेतले. ताब्यात घेताना संबंधित संशयीतांनी पळून जाण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना जेरबंद करण्यात यश मिळवले. सध्याच्या घडीला या सर्वांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सुरज चंद्रदत्त खपाले, ऋतिक उर्फ मुंग्या रतन रोकडे (दोघेही रा. रोकडे वस्ती, चिखली, पुणे) सचिन नितीन गायकवाड (रा. चिखली गावठाण, पुणे), अक्षय गोपीनाथ चव्हाण (रा. लक्ष्मी रोड, चिखली, पुणे) यांच्यासह बाळा उर्फ विकी उर्फ अनिरुद्ध राजू जाधव (रा. जाधव वस्ती, रावेर, पुणे) अशी संशयीतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाचा प्रयत्न केलेल्या गुन्ह्यांमध्ये चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरज खपाले, मुंग्या रोकडे, सचिन गायकवाड व अक्षय चव्हाण यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. वाकड पोलिस ठाणे हद्दीत पिस्तूल तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये अनिरुद्ध जाधव पोलिसांना पाहिजे होता.

या कारवाईनंतर संबंधित संशयीत पसार झाले होते. ते तालुक्यातील घारेवाडी येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, सातारचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, पोलिस उपाधिक्षक डॉ. रणजीत पाटील, तालुका पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस नाईक सज्जन जगताप, अमित पवार, संग्राम फडतरे, पिंपरी चिंचवडचे सहाय्यक फौजदार पठाण यांच्या चमूने सापळा रचुन संबंधित संशयीत राहत असलेल्या ठिकाणी छापा टाकला.

 

हे ही वाचा:

नवाब मलिक यांचा थयथयाट!

आईने आत्महत्या केली, पण पोलीस शिपायाने वाचवले मुलाचे प्राण!

भाजपा कार्यकर्त्यांची हत्या ही प्रतिक्रिया; टिकैत यांच्याकडून हत्येचे अप्रत्यक्षपणे समर्थन

उत्तरप्रदेशात भाजपा सत्ता राखणार तर पंजाबमध्ये त्रिशंकू

 

छापा टाकल्यानंतर संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. बराचवेळ संशयीत आणि पोलिसांत झटापट सुरू होती. त्यात काही संशयितांनी पळुन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी संशयितांचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यांना ताब्यात घेतले.

संबंधितापैकी चारजण पुण्यातील रावण गॅंग मधील असून संशयितांवर चाकण, चिखली, देहूरोड, खेड, निगडी, लोणीकंद आदी पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, दुखापत, पिस्तूल तस्करी असे गुन्हे दाखल आहेत. तालुका पोलिसांनी संशयितांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,436अनुयायीअनुकरण करा
4,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा