34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरक्राईमनामामुंबईतील ताज हॉटेलवर हल्ल्याच्या धमकीचा कॉल 

मुंबईतील ताज हॉटेलवर हल्ल्याच्या धमकीचा कॉल 

Google News Follow

Related

२६/११च्या आठवणींनी थरकाप उडाला

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीच्या दोन घटनांनंतर मुंबईतील ताज हॉटलवर हल्ला होणार असल्याच्या धमकीच्या फोनने मुंबईत खळबळ उडवून दिली होती. मात्र हा कॉल अफवा पसरवण्यासाठी एका १४ वर्षाच्या मुलाने केल्याचे समोर येताच ताज प्रशासन आणि पोलिसांचा जीव भांड्यात पडला आहे.

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे असणाऱ्या ताज हॉटेलच्या स्वागतकक्ष येथे असणाऱ्या दूरध्वनीवर शनिवारी दुपारी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ताज हॉटेलच्या एका गेटमधून दोन मास्कधारी इसम  बंदूक घेऊन हॉटेल मध्ये घुसून हल्ला करणार आहे असे कळवले.

हे ही वाचा:
गरीब घरातील ३३ मुलींच्या धर्मांतराची तयारी केली होती!

शेती कायद्याविरोधातील आंदोलकांचा धुडगूस

तौक्तेग्रस्तांच्या तोंडाला ठाकरे सरकारने पुसली पाने

बापरे!…छातीतून आरपार गेलेली सळई शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढली

२६/११ च्या हल्ल्याच्या आठवणीं ताज्या असताना या अज्ञात कॉल मुळे ताज व्यवस्थापनात कमालीची दहशत पसरली होती. ताज प्रशासनाने ताबडतोब पोलिसांना कळवून स्वतःची सुरक्षा यंत्रणेला अलर्ट केले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी  हॉटेल ताजचे सर्व प्रवेश द्वारांवर तपासणी केली. मात्र त्यांना कुठेच संशयास्पद असे काहीही आढळून आले नाही. हा कॉल अफवा पसरवणयासाठी केला असल्याचे समजले. दरम्यान पोलीसानी आलेल्या कॉल तपासला असता हा कॉल सातारा येथून आल्याचे कळाले. अधिक माहिती मिळवली असता हा कॉल एका १४ वर्षाच्या मुलाने केल्याचे समोर आले आहे.

मध्यंतरी मंत्रालयातही बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने खळबळ उडाली होती. नंतर त्या अफवा असल्याचे लक्षात आले. दोन वेळा अशा धमक्या दिल्याच्या घटना घडल्या होत्या. यासंदर्भात पोलिसांनी अटकही केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा