भारतात बंदी घातलेल्या स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) चा माजी पदाधिकारी आणि ISIS महाराष्ट्र दहशतवादी मॉड्यूल प्रकरणातील प्रमुख आरोपी साकीब नाचन याला सोमवारी ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाचनची प्रकृती अत्यंत गंभीर आहे आणि सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. तिहार तुरुंग अधिकाऱ्यांनी त्याच्या कुटुंबाला त्याच्या वैद्यकीय स्थितीबद्दल माहिती दिली आहे.
इसिस पुणे मॉड्युल प्रकरणात एनआयए ने डिसेंबर २०२३मध्ये ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे टाकण्यात आलेल्या छाप्यात साकीब नाचनसह डझनभर संशयितांना पडघ्यातून अटक करण्यात आली होती, त्याला दिल्ली येथे आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा:
पाकिस्तानचा डोनाल्ड ट्रम्पना ठेंगा, इराण प्रकरणावर चीन-रशियासोबत एकजूट
महिलांच्या हक्कांवर गदा आणणारी ‘खुत्बा शादी’
अभिनंदन वर्धमानला पकडणाऱ्या, पाक अधिकाऱ्याचा चकमकीत मृत्यू!
भाजपा आज देशभरात ‘संविधान हत्या दिन’ साजरा करणार
साकीब नाचन आणि त्याचे डझनभर सहकारी तिहार तुरुंगात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच साकीब नाचन आणि पुणे,मुंबई आणि ठाण्यातून अटक करण्यात आलेल्या इसिसच्या पुणे मॉड्युल प्रकरणात साकीब नाचनचा मुलगा अकिब नाचन आणि इसिस यासंघटनेचे काही सदस्य नवीमुंबईतील तळोजा तुरुंगात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साकीब नाचनला तीन दिवसांपूर्वी तिहार तुरुंगात ब्रेन स्ट्रोकनंतर दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे,मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
