दहशतवाद्यांना पाठिंबा देणारी पाकिस्तानी सेना स्वतःच्या देशात सुरक्षित नाहीयेत. मंगळवार (२४ जून ) रोजी पाकिस्तानातील दक्षिण वझिरिस्तानमधील २ सरगोधा आणि कुर्रम भागात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने पाकिस्तानी सैनिकांवर मोठे हल्ले केले. या हल्ल्यात पाक मेजर मोईज अब्बास यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, पाक मेजर मोईज अब्बास हे हेच आहेत, ज्यांनी भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांना सीमेवर पकडणाचा दावा केला होता.
मेजर मोईज अब्बास यांनी पाकिस्तानी सीमेवर भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना पकडले होते आणि त्यांच्यावर अत्याचार केले होते. आता तहरीक-ए-तालिबानने मेजर अब्बाससह ११ इतर पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले आहे. सध्या, पाकिस्तानी सैन्याने याची पुष्टी केलेली नाही, परंतु असे निश्चितपणे म्हटले आहे की दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत काही सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
२४ जून रोजी पाकिस्तानी सैन्य आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान संघटनेत चकमक झाली. या दरम्यान, ११ पाकिस्तानी सैनिक मारले गेले. या हल्ल्यात मारले गेलेल्या सैनिकांची ओळख पटली तेव्हा अभिनंदन यांना पकडणाऱ्या सैनिकाचे आणि सिक्स कमांडो बटालियनमध्ये तैनात असलेल्या मेजर सय्यद मोईज अब्बास शाह यांचे नाव समोर आले.
हे ही वाचा :
व्हिवा ग्रुपचे मालक मेहुल ठाकूर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल!
भाजपा आज देशभरात ‘संविधान हत्या दिन’ साजरा करणार
आणीबाणी ही लोकशाहीचा काळा अध्याय!
नवा संघ, जुन्या चुका; भारताने इंग्लंडविरुद्ध सामना गमावला
दरम्यान, २०१९ मध्ये मेजर सय्यद मोईज अब्बास यांचे नाव पहिल्यांदाच चर्चेत आले जेव्हा त्यांनी दावा केला की त्यांनी भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील हवाई चकमकीदरम्यान भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना पकडले होते. या घटनेनंतर त्यांनी माध्यमांना अनेक विधाने दिली होती. मेजर सय्यद यांनी दावा केला होता की जेव्हा ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांचे F१६ जेट पाकिस्तानने पाडले तेव्हा ते पाकिस्तानच्या भूमीवर उतरले होते. या काळात त्यांनी आणि त्यांच्या युनिटने अभिनंदन यांना पकडले होते.
