आज देशात आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी आणीबाणीच्या काळात संघर्ष करणाऱ्यांना सलाम केला आणि म्हटले की आणीबाणी ही लोकशाहीचा काळा अध्याय आहे. यावेळी कॉंग्रेसवर त्यांनी जोरदार टीका केली.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, “आज आणीबाणीच्या घोषणेस ५० वर्षे पूर्ण होत आहेत, जो भारताच्या लोकशाहीचा सर्वात काळा अध्याय आहे. हा दिवस संविधान हत्येचा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी भारतीय संविधानाची मूल्ये चिरडली गेली, मूलभूत अधिकार हिरावून घेतले गेले, प्रेस स्वातंत्र्य संपवले गेले आणि अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना तुरुंगात टाकण्यात आले. असे वाटत होते की तत्कालीन काँग्रेस सरकारने लोकशाहीलाच कैद केले आहे.”
आणीबाणीच्या काळात लढणाऱ्यांना श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले, “आणीबाणीविरुद्ध शौर्याने लढणाऱ्या सर्वांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. हे लोक देशाच्या कानाकोपऱ्यातून, प्रत्येक वर्गातून, वेगवेगळ्या विचारसरणीचे होते, ज्यांनी एकाच ध्येयासाठी एकत्र काम केले, भारताच्या लोकशाही रचनेचे रक्षण करणे आणि स्वातंत्र्यसैनिकांचे आदर्श वाचवणे. त्यांच्या सामूहिक संघर्षामुळे तत्कालीन काँग्रेस सरकारला लोकशाही पुनर्संचयित करावी लागली आणि नव्याने निवडणुका घ्याव्या लागल्या, ज्यामध्ये त्यांचा दारूण पराभव झाला.”
पंतप्रधान पुढे म्हणाले, “आपल्या संविधानाच्या तत्त्वांना बळकटी देण्यासाठी आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी एकत्र काम करण्याची आमची वचनबद्धता आम्ही पुन्हा व्यक्त करतो. चला आपण नवीन उंची गाठूया आणि गरीब आणि वंचितांची स्वप्ने पूर्ण करूया.”
हे ही वाचा :
नवा संघ, जुन्या चुका; भारताने इंग्लंडविरुद्ध सामना गमावला
राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प!
ISIS शी संबंध, संशयावरून कोलकात्यातील तिघे अटकेत!
टीव्ही अभिनेत्री गार्गी पटेलची सायबर गुन्हेगाराकडून आर्थिक फसवणूक!
याशिवाय, केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा म्हणाले, “२५ जून १९७५ च्या मध्यरात्री तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी ‘अंतर्गत अशांततेचे’ निमित्त करून भारतावर आणीबाणी लादली, ज्यामुळे देशाचे संविधान नष्ट झाले. ५० वर्षांनंतरही काँग्रेस त्याच मानसिकतेने काम करत आहे, त्यांचे हेतू अजूनही पूर्वीसारखेच हुकूमशाही आहेत.”
